30 September 2020

News Flash

पीएस गोले सिक्कीमचे नवे मुख्यमंत्री, पवन चामलिंग यांची २४ वर्षांची सत्ता संपुष्टात

सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाच्या ११ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा (एसकेएम) चे अध्यक्ष प्रेमसिंह तमांग उर्फ पीएस गोले यांनी राज्यपाल गंगा प्रसाद यांच्याकडून सोमवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी एसकेएमच्या ११ आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. खरेतर गोले यांनी निवडणूक न लढवल्यामुळे ते सध्या राज्य विधानसभेचे सदस्य नाहीत. मात्र एसकेएमचे विधानमंडळ पक्ष नेते म्हणून त्यांची शनिवारी निवड करण्यात आली होती.

तमांग हे नेपाळी भाषेत शपथ घेत असताना, या सोहळ्यासाठी गंगटोक मैदानात उपस्थित हजारो समर्थकांनी आपल्या ५१ वर्षीय पक्ष प्रमुखाच्या जय जयकाराच्या घोषणा दिल्या. तर, माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग व सिक्कीम डेमोक्रेटीक फ्रंट (एसडीएफ) चे वरिष्ठ नेते मात्र या शपथविधी सोहळ्यास गैरहजर होते. २०१३ मध्ये निर्माण झालेल्या ‘एसकेएम’ने ३२ सदस्य असलेल्या सिक्कीम विधानसभेत १७ जागांवर विजय मिळवत, स्पष्ट बहुमत प्राप्त केले. तर ‘एसडीएफ’ला १५ जागा मिळाल्या.

एसकेएमने २४ वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत राहिलेल्या चामलिंग सरकारला सत्तेतून खाली खेचले. चामलिंग यांच्या एसडीएफ पक्षाचे संस्थापक सदस्य राहिलेल्या तमांग यांनी माजी मुख्यमंत्र्याविरोधात बंड करत २०१३ मध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाची स्थापना केली होती. यानंतर २०१४ मधील विधानसभा निवडणुकात त्यांच्या पक्षाला १० जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत त्यांनी एसडीएफ वर भ्रष्टाचार व बेजबाबदार सरकार असल्याचे आरोप केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 3:43 pm

Web Title: ps golay takes oath as sikkim chief minister
Next Stories
1 वंचितांमध्ये ज्यांनी आघाडी धर्म पाळला नाही त्यांची हकालपट्टी-इम्तियाज जलील
2 मोबाइलमध्ये प्रेयसीसोबतचे फोटो डिलीट करायला विसरला! त्यानंतर हत्या, आत्महत्या, चकमक
3 पाकिस्तानातील ऐतिहासिक गुरूनानक महालाची तोडफोड
Just Now!
X