News Flash

करोना काळातलं पहिलं मिशन, ISRO कडून PSLV C49 लाँच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केलं मोहिमेचं कौतुक

फोटो सौजन्य - ISRO ट्विटर हँडल

करोना काळात इस्रोने अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने आपलं मिशन पार पाडलं आहे. ISRO PSLV -C49 चं लाँचिंग करुन भारताने आणखी एक इतिहास घढवला आहे. दुपारी ३ वाजून २ मिनिटांनी हे PSLV C49 लाँच करण्यात येणार होतं मात्र यासाठी १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागला. इस्रोचं हे ५१ वं मिशन आहे. या प्रक्षेपणाचं लाइव्ह प्रसारण इस्त्रोची वेबसाइट, यूट्युब चॅनल, फेसबुक आणि ट्विटरवरही करण्यात आलं. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट हे अर्थ अर्थ ऑब्झर्वेशन रिसेट सॅटेलाइटचेच आधुनिक व्हर्जन आहे. याद्वारे ढगांच्या आडूनही पृथ्वीवरचे फोटो सुस्पष्टरित्या टिपता येणार आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोचं या मोहिमेसाठी कौतुक केलं आहे. आपला देश करोना संकटाशी लढत असतानाही देशाच्या वैज्ञानिकांनी जे यशस्वी लाँचिंग करुन दाखवलं त्याचा मला अभिमान वाटतो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचं कौतुक केलं आहे.

EOS-01 हे एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. याचा उपयोग शेती, फॉरेस्ट्री आणि आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी करण्यात येणार आहे. कस्टमर सॅटेलाईट्सला कमर्शिअल कराराअंतर्गत लाँच करण्यात आला आहे. हा करार न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेससोबत करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 6:21 pm

Web Title: pslvc49 lifts off successfully from satish dhawan space centre sriharikota isro scj 81
Next Stories
1 बिहार : मतदानावेळी ‘राजद’ नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
2 “मदरशांमधून लव जिहादचा प्रसार, ब्राह्मण ते क्षुद्र मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी दिले जातात १० ते २५ लाख”
3 उत्तर प्रदेशात पुन्हा तरुणीच्या छेडछाडीची घटना; विरोध करणाऱ्या वडिलांची आरोपींनी केली हत्या!
Just Now!
X