व्यापम घोटाळ्याबाबत जनजागृती करण्यासाठी मध्य प्रदेशातील एक स्वयंसेवी संस्थेने स्वाक्षऱ्यांची मोहीम हाती घेतली आहे. प्रवेश आणि भरती हा केवळ राजकीय प्रश्न नाही, असा प्रचारही या संस्थेकडून केला जात आहे.
सदर घोटाळा हा केवळ राजकीय प्रश्न नाही, तर सामाजिक प्रश्न आहे. या घोटाळ्यात सहभाग असलेले अधिकारी अथवा राजकीय नेते यांची त्यांच्या पदावरून त्वरित उचलबांगडी करावी, तरच चौकशी नि:पक्षपातीपणे होईल, असे मध्य प्रदेश जनस्वास्थ्य अभियानचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अमूल्य निधी यांनी वार्ताहरांना सांगितले. सदर घोटाळा आणि त्यांचे सामाजिक क्षेत्रावर होणारे परिणाम याबाबत जनजागृती करण्यासाठी स्वाक्षऱ्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या घोटाळ्यात राज्यपाल रामनरेश यादव हे आरोपी असल्याने त्यांना पदावरून हटवावे आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही निधी यांनी केली.