टेनिसपटू सानिया मिर्झा ही पाकिस्ताची सून आहे, तिला ब्रँड अॅम्बॅसिडरपदावरून हाकला अशी मागणी भाजपाचे खासदार राजा सिंह यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याकडे केली आहे. पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त होतो आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार राजा सिंग यांनी सानिया मिर्झाला सदिच्छा दूत पदावरून हटवा अशी मागणी केली आहे.

सानियाने भारतीय असल्याचा दावा केला आहे, मात्र तिने एका पाकिस्तानी खेळाडूशी लग्न केले आहे. त्यामुळे ती पाकिस्तानची सून आहे. तिला तेलंगणच्या सदिच्छा दूत पदावरून हाकलण्यात यावे आणि तिच्या जागी सायना किंवा पी. व्ही. सिंधू यांना हे पद देण्यात यावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सानिया मिर्झाने एक ट्विट केले होते. मी देशभक्त आहे हे वाटण्यासाठी मला सोशल मीडियाची गरज नाही असे तिने म्हटले होते. तसेच ही पोस्ट त्या लोकांसाठी आहे ज्यांना हे वाटते आहे की मी हल्ल्याचा निषेध करणारी पोस्ट केली पाहिजे, कारण आम्ही सेलिब्रिटी आहोत. मात्र मला तशी गरज वाटत नाही असं ट्विट तिने केलं होतं ज्यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोलही झाली. आता तिला तेलंगणच्या सदिच्छा दूत पदावरून हटवा अशीच मागणी भाजपा आमदाराने केली आहे.

पुलवामा या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त होतो आहे. लोक आपल्या पद्धतीने या घटनेचा निषेध व्यक्त करत आहेत. व्यापारी महासंघाने आज भारत बंदचे आवाहन केले आहे. अशात सानिया मिर्झाने जे ट्विट केले त्यामुळे ती ट्रोल झाली आहे. तिला तेलंगणच्या सदिच्छा दूत पदावरून हटवा अशी मागणी भाजपा आमदाराने केली आहे.