23 October 2019

News Flash

पुलवामा पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला, आठ नागरीक जखमी

काश्मीर खोऱ्यात दहशतवादाच्या घटना वाढत चालल्या आहेत. मंगळवारी दहशतवाद्यांनी पुलवामा पोलीस स्टेशनच्या आवारात ग्रेनेड फेकले.

काश्मीर खोऱ्यात दहशतवादाच्या घटना वाढत चालल्या आहेत. मंगळवारी दहशतवाद्यांनी पुलवामा पोलीस स्टेशनच्या दिशेने फेकलेल्या ग्रेनेडचा रस्त्यावर स्फोट झाला. यामध्ये आठ नागरीक जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. या संपूर्ण परिसराला सुरक्षा पथकांनी घेराव घातला आहे.

.

जखमींना उपचारासाठी लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन गंभीर जखमींना श्रीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काल लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या ताफ्याला आईडी स्फोटकांनी लक्ष्य करण्यात आले होते. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अरीहाल येथे जात असताना हल्ला करण्यात आला होता.

मंगळवारी पहाटे अनंतनाग येथील चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. एक जवान शहीद झाला. काश्मीर खोऱ्यातील पुलवामा हल्ल्याच्या शेवटचा सूत्रधार सज्जाद मकबूल भटला सुरक्षा पथकांनी कंठस्नान घातले. त्याने पुलवामा हल्ल्यासाठी आपली गाडी दिली होती. त्याच्याबरोबर तौसिफ हा दहशतवादी सुद्धा ठार झाला.

First Published on June 18, 2019 7:15 pm

Web Title: pulwama police station terrorists throw grenade dmp 82