मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून (एचआरडी) सोमवारी देशातील सर्वोत्तम उच्च शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये देशातील सर्वोत्तम १० विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्थान मिळवले आहे. याउलट एरवी बराच बोलबाला असणाऱ्या मुंबई विद्यापीठाला पहिल्या दहांमध्ये स्थान मिळू शकलेले नाही. त्यामुळे तुर्तास तरी दर्जेदार शिक्षणाच्याबाबतीत पुण्याने मुंबईवर सरशी साधल्याचे चित्र आहे. तर देशातील सर्वोत्तम महाविद्यालयांच्या क्रमवारीत बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने अव्वल स्थान पटकावले आहे.

नॅशनल इन्सिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कच्या (एनआयआरएफ) रँकिंमध्ये गेल्यावर्षी आयआयटी मद्रास, आयआयएम बंगळुरू , मणिपाल कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस या संस्थांनी अव्वल स्थान मिळवले होते. देशभरातील तब्बल ३००० खासगी आणि सरकारी शैक्षणिक संस्थांनी इंडिया रँकिंग २०१६ मध्ये सहभाग नोंदवला होता.

अध्यापनाचा दर्जा , शैक्षणिक सुविधा, निकालाचे प्रमाण, शिक्षणाचा दृष्टीकोन, विद्यार्थ्यांशी संवाद व सर्वसमावेशकता आणि उत्पादक संशोधन या निकषांच्या आधारे नॅक समितीकडून या शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन करण्यात आले होते. यंदा ८०० नव्या शैक्षणिक संस्थांनी या प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून यंदा वैद्यकशास्त्र आणि विधी शाखेच्या सर्वोत्तम महाविद्यालयांचीही यादी जाहीर करण्यात आली.

दरम्यान, येत्या जुलै महिन्यापासून विद्यापीठ व वरिष्ठ महाविद्यालयांच्या मूल्यांकनासाठी ‘नॅक’ समितीकडून नवीन कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नवीन मूल्यांकन आयसीटी (इन्फोम्रेशन कम्युनिकेशन  टेक्नॉलॉजी)च्या आधारावर होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कार्यप्रणालीनुसार मूल्यांकन करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रस्ताव पाठविणे अनिवार्य राहणार असून त्यानंतर महाविद्यालय व विद्यापीठांना नवीन कार्यप्रणालीनुसार ‘नॅक’ समितीला सामोरे जावे लागणार आहे. यासंदर्भात ‘नॅक’चे संचालक डी.पी. सिंग यांनी नुकतीच सूचना जारी केली होती.

Top 10 universities in Common Overall Ranking

1. Indian Institute of Science, Bangalore
2. Indian Institute of Technology, Chennai
3. Indian Institute of Technology, Bombay
4. Indian Institute of Technology, Kharagpur
5. Indian Institute of Technology, Delhi
6. Jawaharlal Nehru University, Delhi
7. Indian Institute of Technology, Kanpur
8. Indian Institute of Technology, Guauhati
9. Indian Institute of Technology, Roorkee
10. Banaras Hindu University

Top 10 universities among 100 universities

1. Indian Institute of Science, Bangalore
2. Jawahalal Nehru University, Delhi
3. Banaras Hindu University, Vasanasi
4. Jawaharlal Nehru Centre for Advanced Research, Bengaluru
5. Jadavpur University, Kolkata
6. Anna University Chennai
7. University of Hyderabad, Telangana
8. University of Delhi
9. Amrita Vishwa Vidaypeetham, Coimbatore, Tamil Nadu
10. Savitribai Phule Pune University, Maharashtra

Top 10 Colleges in India

1. Miranda House, Delhi
2. Loyola College, Madras
3. Shri Ram College of Commerce, New Delhi
4. Bishop Heber College, Tiruchirapalli
5. Atama Ram Sanatan Dharma College, New Delhi
6. St Xavier’s College, Calcutta
7. Lady Shri Ram College for Women, New Delhi
8. Dyal Singh College, New Delhi
9. Deen Dayal Upadhyaya College, New Delhi
10. Womens’ Christian College, Madras

Top 10 Engineering institutes

1. Indian Institute of Technology, Madras
2. Indian Institute of Technology, Bombay
3. Indian Institute of Technology, Kharagpur
4. Indian Institute of Technology, Delhi
5. Indian Institute of Technology, Kanpur
6. Indian Institute of Technology, Roorkee
7. Indian Institute of Technology, Guwahati
8. Anna University, Chennai
9. Jadavpur University, Kolkata
10. Indian Institute of Technology, Hyderabad

Top 10 Management institutes

1. Indian Institute of Management, Ahmedabad
2. Indian Institute of Management, Bangalore
3. Indian Institute of Management, Calcutta
4. Indian Institutes of Management, Lucknow
5. Indian Institute of Management, Kazhikode
6. Indian Institute of Technology, Delhi
7. Indian Institute of Technology, Kharagpur
8. Indian Institute of Technology, Roorkee
9. Jamshedpur Labour Relations Institute, Jamshedpur
10. Indian Institute of Management, Indore