News Flash

ब्लॉगर्सची हत्या करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

बांगलादेशात अविजित रॉय, अनंता बिजॉय दास, वशीकुर रहमान बाबू या ब्लॉगर्सच्या हत्येची चौकशी करून संबंधितांना शिक्षा करावी असे आवाहन वादग्रस्त लेखक सलमान रश्दी, अमिताव

| May 25, 2015 03:03 am

बांगलादेशात अविजित रॉय, अनंता बिजॉय दास, वशीकुर रहमान बाबू या ब्लॉगर्सच्या हत्येची चौकशी करून संबंधितांना शिक्षा करावी  असे आवाहन वादग्रस्त लेखक सलमान रश्दी, अमिताव घोष, मार्गारेट अटवूड यांनी तेथील सरकारला केले आहे.
जगातील दीडशे लेखकांनी केलेल्या आवाहनात ब्लॉगर्सच्या हत्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून लेखक व पत्रकारांविरोधाचे मतस्वातंत्र्य धोक्यात आणून त्यांच्यावर केलेले हल्ले योग्य नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. आवाहन करणाऱ्यात कोलकात्याचे अमिताव घोष व नील मुखर्जी, कादंबरीकार रोहिंटन मिस्त्री यांचाही समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2015 3:03 am

Web Title: punish killers of bangladesh bloggers salman rushdie
टॅग : Salman Rushdie
Next Stories
1 नारायण साई याला तात्पुरता जामीन मंजूर
2 तालिबान्यांच्या हल्ल्यात १० पोलिस ठार
3 लॉटरी घोटाळ्यात पोलिस अधिकारी निलंबित
Just Now!
X