News Flash

पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना द्यावी लागणार डोपिंग टेस्ट

या आदेशानुसार सरकारी सेवेत नियुक्तीच्या प्रत्येक स्तरावर ही टेस्ट होणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत.

पंजाब सध्या नशेच्या विळख्यात अडकले आहे. त्यामुळे चिंतेत असलेल्या राज्य सरकारने बुधवारी ही महत्वाची घोषणा केली. अमरिंदर सिंग यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना नियुक्तीपूर्वी डोपिंग टेस्ट अनिवार्य करण्याचा आदेश दिला.

अमली पदार्थाच्या तस्करीवर कोणत्याही परिस्थितीत प्रतिबंध घालण्यासाठी पंजाब सरकार आक्रमक झाले आहे. त्याच निती अंतर्गत अमली पदार्थांच्या तस्कारांना फाशीची शिक्षा देण्याच्या तरतुदीच्या प्रस्तावानंतर आता मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना भरतीपूर्वी डोपिंग टेस्ट (उत्तेजक द्रव्य चाचणी) अनिवार्य केली आहे. इतकेच नव्हे तर नियुक्तीनंतरही सेवेदरम्यान वेळोवेळी कर्मचाऱ्यांची डोपिंग टेस्ट घेण्यात येणार आहे.

पंजाब सध्या नशेच्या विळख्यात अडकले आहे. त्यामुळे चिंतेत असलेल्या राज्य सरकारने बुधवारी ही महत्वाची घोषणा केली. अमरिंदर सिंग यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना नियुक्तीपूर्वी डोपिंग टेस्ट अनिवार्य करण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार सरकारी सेवेत नियुक्तीच्या प्रत्येक स्तरावर ही टेस्ट होणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत. लवकरच याप्रकरणी अधिसूचना जारी करेल असे सांगण्यात येते. विशेष म्हणजे नियुक्तीनंतरही पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची सेवेच्या प्रत्येक टप्प्यात डोपिंग टेस्ट होईल.

दरम्यान, यापूर्वी मंगळवारी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी पंजाब सरकारने फाशीची शिक्षा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. अमली पदार्थामुळे राज्यातील युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे त्यांना कठोरातील कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 10:34 pm

Web Title: punjab cm capt amarinder singh has ordered mandatory dope test of all govt employees including police personnel
Next Stories
1 महाराजा झुकला चीनपुढे, वेबसाईटवरून हटवलं तैवानला
2 धक्कादायक ! शिक्षिकेचा खून केल्यावर शीर हातात घेऊन जंगलात पसार
3 पावसामुळे साचलेल्या पाण्यात बाथटबमध्ये बसून पाकिस्तानी पत्रकाराचे रिपाेर्टिंग
Just Now!
X