16 December 2017

News Flash

बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन २४ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार

पंजाबमध्ये एका २४ वर्षीय युवतीचे अपहरण करुन तिच्यावर दोन दिवस सामूहिक बलात्कार करुन त्यानंतर

भटिंडा | Updated: January 21, 2013 4:45 AM

पंजाबमध्ये एका २४ वर्षीय युवतीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर दोन दिवस सामूहिक बलात्कार करुन त्यानंतर कारमधून फेकून दिल्याची खळबळजनक घटना  उघडकीस आली आहे. शुक्रवारी (१८ जानेवारी) दोन अज्ञात व्यक्ती आणि दोन महिलांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कामानिमित्ताने चंदिगडला जाणा-या या युवतीचे अपहरण केले. तिला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले व अज्ञात स्थळी नेवून बलात्कार करण्यात आला. त्यानंतर रविवारी पीडीत युवतीला चालत्या कार मधून भटिंडा जवळील रस्त्यावर फेकून देण्यात आले.
पीडित युवतील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. पीडित युवतीने पोलिसांना सांगितले की, “चंदीगडमधील सेक्टर ४३ येथे बसस्थानकावर मी उभी होते आणि पत्ता विचारण्याच्यासाठी त्यांनी कार माझ्याजवळ थांबविली. मी पत्ता सांगत असतांना त्यांनी मला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. त्यानंतर त्यांनी मला कोठे नेले काही कळले नाही व माझ्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्या नराधमांनी त्याची चित्रफीतही बनविली”.

First Published on January 21, 2013 4:45 am

Web Title: punjab girl drugged gangraped filmed thrown out of moving car in bhatinda