News Flash

आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत

पंजाब सरकारची घोषणा

| December 4, 2020 01:51 am

पंजाब सरकारची घोषणा

चंडीगड : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा पंजाब सरकारने गुरुवारी केली.

मानसा जिल्ह्य़ातील बछोना खेडय़ाचा रहिवासी असलेला गरुजत सिंग (६०) हा आंदोलनादरम्यान दिल्लीच्या टिकरी सीमेवर मरण पावला; तर मोगा जिल्ह्य़ाच्या भिंदर खुर्द खेडय़ाचा रहिवासी गुरबचन सिंग (८०) या मोगा येथील आंदोलनाच्या वेळी बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्य़ाने मृत्यू ओढवला.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले असून, त्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली असल्याचे एका सरकारी पत्रकात म्हटले आहे. सिंग व त्यांचा काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असून, पंजाब विधानसभेने या कायद्यांना निष्प्रभ करणारे कायदेही संमत केले आहेत.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही पक्षांनी या मुद्दय़ावर कठोर भूमिका घेऊ नये आणि लवकरच एक सामायिक तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पंजाबची अर्थव्यवस्था व देशाची सुरक्षितता यांच्यावर परिणाम होत असल्याचेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 1:51 am

Web Title: punjab government announced compensation to the families of farmers who died in the agitation zws 70
Next Stories
1 निकाल अचूक असला तरच स्वीकारण्यास तयार- डोनाल्ड ट्रम्प
2 मुखपट्टीविना फिरणाऱ्यांना समुदाय सेवेच्या शिक्षेस स्थगिती
3 तमिळनाडू, पुदुच्चेरीला पावसाने झोडपले
Just Now!
X