राज्यातील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढावे म्हणून दीड लाखांहून अधिक विद्यार्थिनींना पुढील तीन महिन्यांत सायकली पुरविण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. नववी ते बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेचा फायदा मिळणार आहे.
राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या दीड लाखांहून अधिक मुलींना या योजनेचा फायदा मिळणार असून सरकार रूपरेषा तयार करीत आहे, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागमंत्री शरणजित सिंग धिल्लाँ यांनी सांगितले.  शिक्षणाचे घटते प्रमाण कमी होऊन मुलींमध्ये शिक्षण वाढीला लागावे म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे धिल्लाँ म्हणाले. अशा प्रकारची योजना राबविण्यात आल्यामुळे शिक्षण घेणाऱ्या मुलींचे प्रमाण  वाढले असल्याचा दावा त्यांनी केला.