मद्यपान करणे म्हणजे नशेबाजी नव्हे, असे मत पंजाबचे आरोग्य मंत्री सुरजितकुमार ज्यानी यांनी मांडले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून वादविवाद होण्याची शक्यता आहे.
ते म्हणाले, मद्यपान करणे म्हणजे नशेबाजी असे मला वाटत नाही. मद्याची निर्मिती करणाऱ्या उद्योगांना सरकारने परवानगी आणि परवाने दिलेले आहेत. लष्करी जवानांच्या पार्टीमध्ये आणि इतरही पार्ट्यांमध्ये मद्यपान केले जाते. जोपर्यंत सरकार अशा व्यवसायांना परवानगी देते. त्यासाठीचे परवाने विकते. तोपर्यंत तरी याला नशेबाजी म्हणता येणार नाही.