20 October 2020

News Flash

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी जनरल मॅनेजर राजेश जिंदालला अटक

जिंदाल हा ऑगस्ट २००९ ते मे २०११ या कालावधीत ब्रॅडी हाऊस शाखेत शाखा व्यवस्थापक होता. 

( संग्रहीत छायाचित्र )

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने जनरल मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या राजेश जिंदाल याला अटक केली. राजेश जिंदाल हा ऑगस्ट २००९ ते मे २०११ या कालावधीत मुंबईतील फोर्ट येथील ब्रॅडी हाऊस शाखेत शाखा व्यवस्थापक होता.

पंजाब नॅशनल बँकेला बनावट हमी पतपत्राद्वारे ११ हजार ४०० कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघड झाला होता. नीरव मोदी हा या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे. घोटाळ्याचा सीबीआयकडून तपास सुरु आहे. या प्रकरणात सोमवारी सीबीआयने पंजाब नॅशनल बँकेच्या फोर्ट येथील ब्रॅडी हाऊस शाखेला टाळे ठोकले होते. या प्रकरणात अटक झालेले बँकेचे निवृत्त उपमहाव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी आणि कनिष्ठ अधिकारी मनोज खरात यांची कसून चौकशी केल्यानंतर ब्रॅडी हाऊस शाखा सीबीआयच्या रडारवर आली. हे दोघेही याच शाखेत कार्यरत होते.  सोमवारी सीबीआयचे अधिकारी दिवसभर या शाखेत ठाण मांडून होते. तपास यंत्रणेने सोमवारी बँकेच्या तीन अधिकाऱ्यांना अटकही केली होती. यात बँकेचे मुख्य व्यवस्थापक बिच्चू तिवारी, परकीय चलन विभागाचे व्यवस्थापक यशवंत जोशी आणि निर्यात अधिकारी प्रफुल्ल सावत यांचा समावेश होता.

मंगळवारी रात्री उशिरा सीबीआयने पीएनबीतील जनरल मॅनेजर राजेश जिंदाल याला देखील अटक केली. तो ऑगस्ट २००९ ते मे २०११ दरम्यान ब्रॅडी हाऊस शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात सीबीआयने पाच जणांना अटक केली होती. यात फायरस्टार डायमंड्स इंटरनॅशनल समूहाचा अध्यक्ष विपुल अंबानी, नीरव मोदीच्या कंपनीतील कार्यकारी सहाय्यक कविता माणकीकर, फायरस्टाचा वरिष्ठ अधिकारी अर्जुन पाटील, नक्षत्र समूहाचा मुख्य वित्त अधिकारी कपिल खंडेलवाल आणि गीतांजली समूहाचा व्यवस्थापक नितीन शाही यांचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 9:25 am

Web Title: punjab national bank fraud cbi arrested general manager rajesh jindal who was branch head at brady house branch
Next Stories
1 कृष्णा लाल कोहली ठरल्या पाकिस्तानातील निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या दलित महिला
2 मुख्य सचिव मारहाण प्रकरण: आपच्या आमदाराला रात्री उशिरा अटक
3 अनैतिक संबंधाच्या संशयातून महिलेने पतीचे गुप्तांग कापले
Just Now!
X