News Flash

PNB Bank : पंजाब नॅशनल बँकेची ‘ही’ सेवा होणार आजपासून बंद!

जर आपण पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

PNB Bank

PNB Bank : जर आपण पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) ग्राहक असाल तर ही बातमी गांभीर्याने वाचा. कारण आजपासून (३० एप्रिल) बँकेने आपली ई-वॉलेट सेवा ‘पीएनबी किट्टी’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांनी या वॉलेटमधील पैसे खर्च करावेत किंवा आपल्या अकाऊंटला ट्रान्सफर करावेत असे बँकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.

बँकेने आपण ई-वॉलेट सेवा बंद करीत असल्याची घोषणा यापूर्वीच केली होती. ३० एप्रिल २०१९पासून ‘पीएनबी किट्टी’ ही ई-वॉलेटची सेवा आम्ही बंद करीत आहोत, त्यामुळे ग्राहकांनी यातील पैसे खर्च करावेत किंवा अकाऊंटला ट्रान्सफर करावेत तसेच हे अॅप बंद करावे अशी सूचना बँकेकडून ग्राहकांना देण्यात आली होती.

बँकेने दिलेली डेडलाईन आज पूर्ण होत आहे. त्यामुळे उद्यापासून या वॉलेटच्या माध्यमांतून पीएनबीच्या ग्राहकांना कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. पीएनबी किट्टी हे एक डिजिटल वॉलेट असून ग्राहकांना ऑनलाइन व्यवहारांची सेवा देते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 3:31 pm

Web Title: punjab national banks this service will be closed from today
Next Stories
1 मोदी-अमित शाह म्हणजे अहिरावण, महिरावण-रामदास फुटाणे
2 Akhilesh Yadav : नरेंद्र मोदींवर ७२ वर्षांसाठी बंदी घाला, अखिलेश यादव यांची मागणी
3 Priyanka Gandhi :राहुल गांधी हिंदुस्थानी आहेत हे वास्तव देशाला ठाऊक-प्रियंका गांधी
Just Now!
X