पंजाब पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावत रविवारी ३ दहशतवाद्यांना अटक केल्याचा दावा केला आहे. हे दहशतवादी पाकिस्तानी गुप्तचर संस्था (आयएसआय) पुरस्कृत दहशतवादी संघटना असलेल्या शीख युथ फाऊंडेशनशी संबंधित आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांकडून .३२ बोअरचे पिस्तुल, एक मँगझीन आणि १० काट्रेज आणि ७ काट्रेजवाली .३८ बोअरची रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले आहे. या दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे सर्वजण भारतात दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे ते आपल्या योजनेत यशस्वी होऊ शकले नसल्याचे सांगितले जाते.

अटक करण्यात आलेल्यांपैकी गुरूदयाल सिंग आणि जगरूप सिंग या दोघांना पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर तिसरा दहशतवादी सतविंदर सिंग हा त्यांचा भारतातील स्थानिक मदतनीस होता. यापूर्वी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत त्यांच्या देशात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांवर शनिवारी कारवाई केली होती. या सर्वांचे पाककडून बँक खाते सील करण्यात आले आहेत.