News Flash

पंजाब प्रदेश काँग्रेसबाबतचा अहवाल सोनिया गांधी यांना सादर

पंजाबचे उपमुख्यमंत्री म्हणून सिद्धू यांच्या नावाची चर्चा असल्याचेही सूत्रांनी सांगितले. मात्र याबाबतचा निर्णय श्रीमती गांधी घेणार आहेत.

सुधारित पक्ष संघटनेत समाजातील सर्व स्तर, जाती आणि धर्म यांना सामावून घेण्याची शिफारस त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री म्हणून सिद्धू यांच्या नावाची चर्चा

पंजाब प्रदेश काँग्रेसमधील गटबाजी संपवण्याच्या उद्देशाने अ.भा. काँग्रेस समितीतर्फे स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यांच्या समितीने तिचा अहवाल गुरुवारी पक्षप्रमुख सोनिया गांधी यांना सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व पंजाबचे प्रभारी हरीश रावत आणि माजी खासदार जे.पी. अगरवाल यांचा समावेश होता. सुधारित पक्ष संघटनेत समाजातील सर्व स्तर, जाती आणि धर्म यांना सामावून घेण्याची शिफारस त्यांनी केली.

वरच्या स्तरावर कुठलेही मोठे बदल सुचवण्यात आलेले नसले, तरी नवज्योतिसिंग सिद्धू यांना नव्या रचनेत ‘योग्यप्रकारे सामावून घेतले जावे’ असे समितीने म्हटले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंजाबचे उपमुख्यमंत्री म्हणून सिद्धू यांच्या नावाची चर्चा असल्याचेही सूत्रांनी सांगितले. मात्र याबाबतचा निर्णय श्रीमती गांधी घेणार आहेत.

पंजाबमध्ये पुढील वर्षी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समितीने यापूर्वी राज्यातील अनेक नेत्यांशी विचारविनिमय केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 12:08 am

Web Title: punjab pradesh congress on behalf of the congress committee party chief sonia gandhi navjyotisingh sidhu akp 94
Next Stories
1 प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन
2 ‘कू’ या भारतीय समाजमध्यमाचा नायजेरियात वापर
3 योगी आदित्यनाथ दिल्ली दौऱ्यावर
Just Now!
X