News Flash

संतापजनक ! शौचालयात सॅनिटरी पॅड सापडले, चौकशीसाठी विद्यार्थिनींना कपडे काढायला लावले

शाळेतील शौचालयात सॅनिटरी पॅड सापडल्यानंतर त्याच्या चौकशीसाठी शिक्षिकांनी विद्यार्थिनींचे कपडे उतरवून झडती घेतल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे.

(शाळेचं सांकेतिक छायाचित्र)

शाळेतील शौचालयात सॅनिटरी पॅड सापडल्यानंतर त्याच्या चौकशीसाठी शिक्षिकांनी विद्यार्थिनींचे कपडे उतरवून झडती घेतल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यातील एका सरकारी कन्या शाळेतील शौचालयात सापडलेल्या सॅनिटरी पॅडच्या चौकशीसाठी शिक्षिकांनी काही विद्यार्थिनींचे कपडे उतरवले.

फाजिल्का जिल्ह्यातील कुंडल गावातील एका कन्या शाळेत 3-4 दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शिक्षण सचिवांना दिले आहेत. तसंच, दोन शिक्षिकांची बदली करण्यात आल्याचीही माहिती आहे. वापरलेले सॅनिटरी पॅड हे कचरा डब्यात न टाकता शौचालयात फेकल्याच्या कारणावरुन हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत काही मुली रडताना दिसत आहेत. शिक्षिकांनी आपल्याला कपडे उतरवायला सांगितल्याचं त्या विद्यार्थिनी या व्हिडिओत रडत सांगत आहेत. या प्रकाराची माहिती पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मिळाल्यानंतर त्यांनी दोन शिक्षिकांना निलंबित केले आहे. यासोबतच एक कमिटी गठीत करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शिक्षण सचिवांना सोमवारपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून कारवाई करण्याचे सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 12:04 pm

Web Title: punjab schoolgirls allegedly stripped for sanitary pad
Next Stories
1 भाजपा नेत्याच्या कार्यकर्त्यांकडून गँगरेपची धमकी, काँग्रेस महिला सचिवाचा आरोप
2 अयोध्येत मशीद बांधल्यास हिंदू असहिष्णू होतील – उमा भारती
3 मध्य प्रदेशमध्ये भाजपा उमेदवाराचे निधन
Just Now!
X