News Flash

लोकसभेत धक्काबुक्की

राज्यसभाही दिवसभरासाठी तबकूब करण्यात आली. मंगळवारी संविधान दिनानिमित्त संसदेचे एक दिवसाचे संयुक्त अधिवेशन होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

राज्यातील सत्ताकारणाचे पडसाद; दोन्ही सदनांचे कामकाज तहकूब

राज्यातील सत्ताकारणावरून संतप्त झालेल्या काँग्रेसच्या खासदारांनी मंगळवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत येत  प्रचंड घोषणाबाजी केली. लोकशाहीची हत्या करण्यात आल्याचा आरोप हे खासदार हातात फलक घेऊन करत होते. हे फलक आणि काँग्रेसच्या दोन खासदारांना सभागृहाबाहेर काढण्याचा आदेश लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला. त्यानंतर सभागृहातील मार्शल आणि काँग्रेस खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली.

लोकसभेत आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या खासदारांच्या गदारोळामुळे सभागृह बारा वाजेपर्यंत नंतर दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले. राज्यसभाही दिवसभरासाठी तबकूब करण्यात आली. मंगळवारी संविधान दिनानिमित्त संसदेचे एक दिवसाचे संयुक्त अधिवेशन होत आहे. २६ नोव्हेंबर रोजी संविधानाच्या स्वीकृतीला सत्तर वर्षे पूर्ण होत असून त्याप्रीत्यर्थ विशेष अधिवेशन होणार आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे तीव्र पडसाद सोमवारी संसदेच्या आवारात उमटले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या खासदार आणि नेत्यांनी सोमवारी संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यासमोर जोरदार निदर्शन केले. ‘लोकशाहीची हत्या’ असे ठळक अक्षरात लिहिलेले फलक घेऊन काँग्रेस खासदार घोषणाबाजी करत होते. गेल्या आठवडय़ात लोकसभेत गरहजर असलेले राहुल गांधी यांचा सोमवारी लोकसभेत प्रश्न होता. आपण सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी उभे आहोत, पण तो विचारून काहीही उपयोग नाही कारण महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झालेली आहे, असे राहुल म्हणाले.

प्रश्नोत्तराच्या तासाला झालेल्या गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसचे खासदार टी. एन. प्रथापन आणि हिबी एडेन यांना सभागृहाबाहेर काढण्याचा आदेश मार्शलना दिला. त्याला काँग्रेसच्या खासदारांनी विरोध केल्यामुळे मार्शल आणि खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रसच्या महिला खासदारांनाही मार्शलनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. खासदारांचे गरवर्तन सभागृहात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला. सत्ताधारी पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही काँग्रेस खासदारांच्या वर्तनाचा निषेध केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 2:42 am

Web Title: pushbukki in the lok sabha akp 94
Next Stories
1 सुभाष चंद्रा यांचा ZEEच्या चेअरमनपदाचा राजीनामा
2 स्फोटके आणून एकाच वेळी सगळयांना संपवा, दिल्ली प्रदूषणावरुन सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं
3 महाराष्ट्रातील राजकारणावरुन लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या दोन खासदारांचे निलंबन
Just Now!
X