पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच कतारला दिलेल्या भेटीच्या दरम्यान सदिच्छा म्हणून २३ भारतीय कैद्यांना सोडण्यात आले आहे.

मोदी यांनी कतारमधील भारतीयांच्या कल्याणाचा विषय उपस्थित केला होता. त्यानंतर रमझानच्या पवित्र महिन्याचा मुहूर्त साधून २३ कैद्यांची सुटका करण्यात आली, हे भारतीय कैदी लवकरच मायदेशी परतरणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारच्या या कृतीचे स्वागत केले असून आमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांचे आभार मानले आहेत.