दक्षिण तैवानमध्ये आज पहाटे बसलेल्या जोरदार भूकंपाच्या धक्क्यामुळे इमारत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २२१ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. तैनान शहर व परिसराला ६.४ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्र तैनान शहरापासून ४८ किलोमीटर अंतरावर जमिनीखाली १६.७ किलोमीटर खोल होते.
भूकंपाच्या धक्क्याने १७ मजली इमारत कोसळल्याने १० दिवसांच्या बाळासह चौघांचा मृत्यू झाला आहे. ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत २२४ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर १५४ जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे.