News Flash

मेगन मर्केलच्या गंभीर आरोपांवर अखेर ब्रिटीश राजघराण्याने सोडलं मौन; म्हणाले…

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्याकडून निवेदन प्रसिद्ध

संग्रहित

प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केलने केलेल्या गंभीर आरोपांनंतर ब्रिटीश राजघराणं सध्या चर्चेत आहे. पती प्रिन्स हॅरीसोबत ओपरा विन्फ्रेला (Oprah Winfrey) दिलेल्या एका मुलाखतीत मेगल मार्केलने राजघराण्याला आपल्या बाळाचा रंग काय असेल याची चिंता होती असा खुलासा केला होता. तसंच राजघराण्यात असताना आपल्या मनात सतत आत्महत्येचे विचार येत होते असाही गौप्यस्फोट केला होता. या सर्व आरोपांना ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी उत्तर दिलं असून प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांच्याबाबत चिंता आणि सहानुभूती व्यक्त केली आहे. एएफपीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

“राजघराण्याला बाळाच्या रंगाची चिंता होती”; मेगन मार्कलनं सांगितली ब्रिटीश राजघराण्यातील गुपितं

“गेली काही वर्ष हॅरी आणि मेगन यांच्यासाठी कितपत आव्हानात्मक होती हे समोर आल्यानंतर कुटुंबाला त्यांच्यासंबंधी चिंता सतावत आहे. जे मुद्दे उपस्थित करण्यात आले आणि त्यातही खासकरुन रंगाचा तो खूप चिंता निर्माण करणारा आहे. काही गोष्टींमध्ये मतांतर असू शकतं पण हे सर्व गांभीर्याने घेण्यात आलं असून कुटुंब खासगीत यासंबंधी चर्चा करेल,” असं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी हॅरी, मेगन आणि आर्ची हे नेहमीच कुटुंबातील प्रिय सदस्य असतील असंही स्पष्ट केलं.

मेगन मर्केलने काय आरोप केले –
“आर्चीच्या जन्माआधी कुटुंबातील सदस्यांची प्रिन्स हॅरीसोबत चर्चा झाली होती, यावेळी त्यांना बाळाचा रंग काय असेल याची चिंता सतावत होती. बाळ जन्माला येईल तेव्हा रंग गोरा नसेल याची चिंता असल्याने राजघराणं त्याला प्रिन्स करण्यासाठी तसंच कोणतीही सुरक्षा पुरवण्यास इच्छुक नव्हतं. हॅरीने कुटुंबीयांनी त्याच्याशी केलेल्या चर्चेची माहिती मला दिली होती,” असं मेगनने सांगितलं होतं. मेगनने यावेळी ही चर्चा करणाऱ्या कुटुंबातील सदस्याचं नाव उघड करण्यास नकार दिला. नाव उघड करणं त्यांच्यासाठी खूप नुकसान करणारं ठरेल असं मेनने म्हटलं.

मनात आत्महत्येचे विचार येत होते
मेननने यावेळी राजघराण्यात आपण होतो तेव्हा मनात आत्महत्येचे विचार येत होते असा खुलासाही केला. तिने सांगितलं की, “हे त्यावेळीही आणि हॅरीला सांगण्यास मला लाज वाटत होती की….मला अजून जगण्याची इच्छा नव्हती”.

“माझ्या मनात हा एक अगदी स्पष्ट आणि वास्तविक आणि भयानक विचार सतत येत होता. मदतीसाठी मी एका संस्थेत गेली होती. मला मदत मिळवण्यासाठी कुठे तरी गेलं पाहिजे असं मी सांगितलं होतं. याआधी मला असं कधीच वाटलं नसून, कुठेतरी गेलं पाहिजे असं सांगितंल. यावर मी असं करु शकत नाही, हे संस्थेसाठी योग्य नाही असं सांगण्यात आलं,” अशी माहिती मर्कलने दिली. मेगन आणि हॅरी यांनी गतवर्षी राजघराण्याचं सदस्यत्व सोडलं होतं.

खूप एकटेपणा वाटत होता
मेगनने मुलाखतीत सांगितलं की, “राजघराण्याशी जोडलं गेल्यानंतर आपलं स्वातंत्र्य खूप कमी झालं होतं. राजघराण्यामुळे खपू एकटेपणा आला होता. अनेक दिवस आपल्याला एकटेपणा जाणवत होता. याआधी इतका एकटेपणा आपल्याला कधीच जाणवला नव्हता. आपल्याला अनेक नियमांनी बांधून ठेवलं होतं. मित्र-मैत्रीणींसोबत बाहेर लंचसाठी जाण्याची मुभादेखील नव्हती”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 8:49 am

Web Title: queen elizabeth ii responded racism claims from grandson prince harry and his wife meghan sgy 87
Next Stories
1 ब्रिटनच्या संसदेतील चर्चेबाबत भारताचा आक्षेप
2 संसदेत इंधनभडका!
3 ‘कोव्हॅक्सिन’ प्रभावी
Just Now!
X