30 October 2020

News Flash

बाबासाहेब उवाच्च- कायम लक्षात ठेवावे असे बाबासाहेबांचे २० विचार

डॉ. बाबासाहेबांनी अनमोल अशी साहित्य निर्मिती केली आहे, जी आजच्या काळातही सुसंगत आहे

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह... १९ नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची अर्थशास्त्राच्या प्राध्यापकपदी नियुक्ती झाली त्यावेळीचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)

आज १४ एप्रिल २०१८ ही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. पिढ्यानपिढ्या जातीपातीच्या जोखडात अडकलेल्या, सगळ्याच पातळ्यांवर मागास राहिलेल्या पददलित समाजाला त्याच्यावरच्या अन्यायाची जाणीव करून देत, संघर्ष करण्यासाठी उभं राहण्याची प्रेरणा देण्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य अजोड आहे. डॉ. बाबासाहेबांनी अनमोल अशी साहित्य निर्मिती केली आहे, जी आजच्या काळातही सुसंगत आहे. बाबासाहेबांच्या कारकिर्दितील अनेक विधानं समाज परिवर्तनास कारणीभूत ठरली. त्यातीलच काही महत्त्वपूर्ण विधानांवर आपण प्रकाश टाकणार आहोत.

 • नवरा- बायकोचे नाते हे सर्वात निकटच्या मित्र- मैत्रिणीसारखेच असावे.
 • आयुष्य दीर्घ असण्यापेक्षा मोठं असलं पाहिजे.
 • एखाद्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून मी तो समाज किती प्रगत झाला आहे ते पाहतो.
 • मी अशा धर्माला मानतो जो समता, बंधुता आणि स्वातंत्र्य देऊ शकेल.
 • बौद्धिक विकास हाच मानवाच्या अस्तित्वाचे मुख्य लक्ष्य असले पाहिजे.
 • आपण सर्वात आधी आणि शेवटी एक भारतीय आहोत.
 • शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
 • शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.
 • जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचं ते शिकवेल.
 • राजकारण हे शरीर आहे तर न्यायव्यवस्था हे औषध. त्यामुळे शरीर जर आजारी पडले तर त्या शरीराला औषध देणे जरुरीचे आहे.
 • मनुष्य आणि कल्पना या दोन्ही नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे एखाद्या रोपट्याला पाण्याची गरज असते अगदी त्याचप्रमाणे कोणतीही कल्पना आणखी खुलवण्याची गरज असते अन्यथा दोन्ही गोष्टी कोमेजून अखेर नष्ट होतील.
 • ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला आहे, त्या लोकांचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य आहे. ही जाणीव ज्यांना आहे ते धन्य आहेत.
 • काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.
 • माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.
 • जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.
 • तुमच्या मताची किंमत मीठ- मिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्यादिवशी तुम्हाला कळेल, तेव्हा ते मत विकत घेऊ पाहणाऱ्यां इतके कंगाल कोणी नसेल.
 • मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते.
 • शिका! संघटीत व्हा! संघर्ष करा!
 • सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2018 8:30 am

Web Title: quotable quotes of babasaheb ambedkar on his 127th birth anniversary
Next Stories
1 ‘भीमराव रामजी आंबेडकरां’चा मतलबी वापर
2 धन्य ती माता अन् धन्य तो भीम
3 अर्थशास्त्री आंबेडकर !
Just Now!
X