News Flash

… आणि मोरोक्कोतील विद्यापीठाने भारताचा चुकीचा नकाशा झाकला

राबतमधील मोहम्मद व्ही विद्यापीठामध्ये हमीद अन्सारी व्याख्यान देणार होते

मोरोक्कोची राजधानी राबतमध्ये उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कार्यक्रमस्थळाबाहेर लावण्यात आलेल्या एका फलकावर भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आला होता. या नकाशामध्ये पाकिस्तानचा भागही भारताच्याच नकाशामध्ये दाखविण्यात आला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तेथील भारतीय अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केल्यावर संबंधित संपूर्ण नकाशावर पांढरे स्टिकर लावण्यात आले.
राबतमधील मोहम्मद व्ही विद्यापीठामध्ये हमीद अन्सारी व्याख्यान देणार होते. त्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होण्यापूर्वीच अधिकाऱ्यांना नकाशातील चूक लक्षात आली. त्यांनी लगेचच ही चूक विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत ती दुरुस्त करण्यास सांगितले. त्यानंतर फलकावरील नकाशावर पांढरे स्टिकर लावून तो झाकण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 3:34 pm

Web Title: rabat the erroneous maps were covered by college officials
Next Stories
1 महागाईचा आणखी चटका; विनाअनुदानित सिलिंडर, जेट फ्युएल महागले
2 स्वयंसेवक संघाच्या शाळेत शिकणारा मुस्लिम विद्यार्थी दहावीत अव्वल
3 Triple Talaq: तोंडी तलाक देण्याची पद्धत बंद करण्यासाठी याचिका; ५० हजार महिला, पुरुषांची स्वाक्षरी
Just Now!
X