संरक्षणमंत्री राजनाथसिंह, फ्रान्सचे संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ले आणि भारतीय लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी अंबाला हवाई तळावर आयोजित करण्यात येणाऱ्या एका समारंभात पाच राफेल विमाने औपचारिकपणे भारतीय हवाई दलात (आयएएफ) दाखल करून घेण्यात येणार आहेत.

भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षणविषयक आणि सुरक्षाविषयक सहकार्य अधिकाधिक वृद्धिंगत करण्याबाबत राजनाथसिंह आणि पार्ले अंबालामध्ये चर्चा करणार आहेत. पार्ले यांचे गुरुवारी आगमन होणार असून समारंभ आटोपल्यानंतर त्वरितच ते मायदेशी रवाना होणार आहेत.

भारतात २९ जुलै रोजी पहिली पाच राफेल विमाने दाखल झाली, भारत आणि फ्रान्स यांच्यात ५९  हजार कोटी रुपयांचा ३६ राफेल विमानांबाबतचा करार करण्यात आला आहे.