News Flash

VIDEO: …आणि जगातले सर्वोत्तम फायटर पायलट ‘राफेल’ला घेऊन आकाशात झेपावले

फ्रान्स ते भारत ७ हजार किलोमीटरचा प्रवास

फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन अखेर बहुचर्चित राफेल विमानांच्या पहिल्या तुकडीने भारतात येण्यासाठी उड्डाण केले आहे. फ्रान्स ते भारत या ७ हजार किलोमीटरच्या प्रवासात ही विमाने फक्त यूएईमधील फ्रेंच एअर बेसवर एकदा लँडिंग करतील. फ्रान्समध्ये प्रशिक्षित करण्यात आलेले भारतीय वैमानिक ही विमाने घेऊन भारतात येत आहेत.

या विमानांनी फ्रान्समधून उड्डाण करण्यापूर्वी फ्रान्समधील भारतीय राजदूतांनी तिथे जाऊन भारतीय वैमानिकांची भेट घेतली. “डासू कंपनीने वेळेवर या विमानांची डिलिव्हरी केल्याबद्दल तसेच फ्रेंच एअरफोर्स आणि तिथल्या सरकारचे आभार मानले. ही विमाने भारतात घेऊन येणे, ही भारतीय वैमानिकांसाठी अभिमानाची बाब असून ते उड्डाणासाठी प्रचंड उत्सुक्त आहेत. राफेलमुळे भारताची हवाई शक्ती कैकपटीने वाढणार आहे” असे भारतीय राजदूतांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

जगातले सर्वोत्तम वैमानिक राफेलला घेऊन आकाशात झेपावले आहेत. भारत-फ्रान्स संरक्षण सहकार्य नव्या उंचीवर पोहोचण्याचे हे संकेत आहेत असे टि्वटमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 1:06 pm

Web Title: rafale aircrafts maneuvered by the worlds best pilots soar into the sky dmp 82
Next Stories
1 १०० रुपयांसाठी पालिका कर्मचाऱ्यांनी हातगाडी पलटी केलेल्या ‘त्या’ मुलाला मदतीचा ओघ; घर आणि शिक्षणाची सुविधा
2 मराठा आरक्षण; एक सप्टेंबरपासून अंतिम सुनावणी, तोपर्यंत नोकर भरती नाही
3 अखेर राफेल विमानांची पहिली तुकडी फ्रान्सकडून भारताकडे झेपावली…
Just Now!
X