11 August 2020

News Flash

Rafale deal: संरक्षण मंत्रालयातील कागदपत्रांची चोरी; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल, अशी माहिती महाधिवक्त्यांनी सुप्रीम कोर्टात दिली.

संग्रहित छायाचित्र

राफेल प्रकरणात संरक्षण मंत्रालयातून चोरी केलेल्या कागदपत्रांच्या आधारे बातम्या छापण्यात आल्या आहेत. या कागदपत्रांच्या आधारे बातमी छापणारे दोन इंग्रजी वृत्तपत्रांविरोधात ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता के के वेणुगोपाळ यांनी सुप्रीम कोर्टात दिली.

फ्रान्सबरोबर ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी झालेल्या कराराला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावणाऱ्या १४ डिसेंबरच्या आपल्या आदेशाच्या फेरविचाराची तयारी सुप्रीम कोर्टाने २१ फेब्रुवारी रोजी दर्शवली होती. यासाठी वेगळ्या पीठाची रचना देखील करण्यात आली. बुधवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याचिकांवर सुनावणी झाली.

तुमच्याकडे काही ठोस माहिती किंवा कागदपत्रे आहेत का, असा सवाल सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्ते यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि प्रशांत भूषण यांना सुनावणीच्या सुरुवातीला विचारला. भूषण यांनी राफेल प्रकरणात वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांचा दाखला देण्याचा प्रयत्न केला. यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी भूषण यांना आम्ही ‘द हिंदू’ वृत्तपत्रात छापून आलेली बातमी किंवा एन राम यांच्या लेखांच्या आधारे सुनावणी घेणार नाही, असे सांगितले. यावर आम्ही एक प्रतिज्ञापत्र दाखल करु, अशी माहिती भूषण यांनी दिली. मात्र, कोर्टाने नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करुन घेणार नाही, असे स्पष्ट केले.

महाधिवक्ता के के वेणुगोपाळ यांनी देखील कोर्टात बाजू मांडली. राफेल प्रकरणात संरक्षण मंत्रालयातून कागदपत्रांची चोरी करण्यात आली असून चोरी केलेल्या कागदपत्रांच्या आधारे बातम्या छापणाऱ्या दोन वृत्तपत्रांविरोधात ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी कोर्टात दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2019 1:19 pm

Web Title: rafale deal attorney general k k venugopal cji gogoi stolen documents official secrets act
Next Stories
1 बॅक अप हवा असेल तर मदत करु शकतो, वेबसाईट हॅक झाल्यानंतर काँग्रेसचा भाजपाला टोला
2 नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार, तोफांचा मारा
3 हिंदूंविरोधी वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी
Just Now!
X