News Flash

मनोहर पर्रिकर यांच्या जीवाला धोका – काँग्रेस

गोवा काँग्रेसच्या अध्यक्षांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे

(संग्रहित छायाचित्र)

माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणी गोवा काँग्रेसने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. यासाठी गोवा काँग्रेसच्या अध्यक्षांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. ‘राफेल कराराच्या संदर्भातील फाईल्स आपल्या बेडरुम मध्ये आहेत’, असे मनोहर पर्रिकर बोलल्याचा दावा करणारी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची कथित ऑडिओ क्लीप काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या क्लिपच्या आधारावर काँग्रेसने पर्रिकर यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे.

राफेल कराराच्या महत्त्वपूर्ण फाइल्स देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे आहेत. ते ध्यानात घेता राफेल कराराचं सत्य समोर येऊ नये आणि या भ्रष्टाचाराचे पुरावे हाती लागू नयेत, असे ज्यांना वाटत आहे, त्यांच्यापासून पर्रिकर यांच्या जिवाला धोका आहे, असं पत्रात नमूद केले आहे.

राफेल कराराच्या फाइल्स हस्तगत करण्यासाठी प्रसंगी पर्रिकर यांच्यावर हल्लाही होऊ शकतो. त्यामुळे पर्रिकर यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची आवश्यकता आहे, अशी विनंती गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या दोन पानी पत्रात केली. राफेल डीलमधील भ्रष्टाचार ज्यांना समोर येऊ द्यायचा नाही ते पर्रिकरांच्या जीवाला धोका पोहचवू शकतात. त्यामुळे राष्ट्रपतींनी याची दखल घ्यावी आणि पर्रिकरांना आणखी सुरक्षा दिली जावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2019 10:32 am

Web Title: rafale deal goa congress writes letter to president to enhance security of goa cm manohar parrikar
Next Stories
1 रावणाने लंकेत विमानतळ उभारले होते, आंध्र विद्यापीठाच्या कुलगुरूंचा दावा
2 महिला संशोधकांनाही समान संधी मिळावी
3 शबरीमलावरून केरळ धुमसतेच
Just Now!
X