News Flash

राफेल करार म्हणजे मोदी अंबानींचा ब्लॉकबस्टर सिनेमा-काँग्रेस

मोदी आणि अंबानींचा हा सिनेमा एकदम ब्लॉकब्लस्टर ठरल्याचीही टीका या ट्विटमध्ये करण्यात आली आहे.

राफेल करार म्हणजे मोदी अंबानींचा ब्लॉकबस्टर सिनेमा-काँग्रेस

फ्रान्ससोबत झालेला राफेल विमानांचा करार म्हणजे ब्लॉकबस्टर सिनेमा आहे असा ट्विट काँग्रेसने केला आहे. या सिनेमात मैत्री, पटकथेतले नाटकी प्रसंग, रहस्य, विश्वासघात आहे. राफेल करारासंबंधीच्या ब्लॉकबस्टरमध्ये लष्कराच्या सैनिकांचे शौर्य आणि देशभक्ती पणाला लावण्यात आली आहे. मोदी आणि अंबानींचा हा सिनेमा एकदम ब्लॉकबस्टर ठरल्याचीही टीका या ट्विटमध्ये करण्यात आली आहे. या ट्विटमध्ये अनिल अंबानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर आकाशात दोन हृदयांचं चित्र दाखवण्यात आलं त्या दोन्ही हृदयांमधून राफेल विमान जाताना दाखवण्यात आलं आहे. तसंच एक व्हिडीओही ट्विट करण्यात आला आहे. त्यामध्येही राफेल करार हा ब्लॉकबस्टर सिनेमाप्रमाणेच आहे असं म्हटलं आहे. #ModiAmbaniRafaleBlockbuster हा हॅशटॅगही काँग्रेसने ट्रेंड केला आहे.

राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबानी यांचा फायदा होण्यासाठी फेरबदल केले असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी चोर, चोरांचे सरदार आहेत अशीही टीका त्यांनी केली. राफेल करारातील विमानांची किंमत यूपीएच्या काळात होती त्यापेक्षा कैकपटीने वाढली आहे असाही आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देणारे व्हिडीओ आणि सोशल पोस्ट भाजपानेही पोस्ट केल्या. तसेच राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका करताना मर्यादा सोडल्याचीही टीका भाजपाने केली. तरीही काँग्रेसने राफेल करारावरून टीका करणे सोडलेले नाही. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा चांगलाच चर्चेत आणला जातो आहे. राफेल करारात मोदी सरकारने भ्रष्टचार केला असाही आरोप काँग्रेसने केला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2018 11:59 am

Web Title: rafale deal is modi and ambanis blockbuster film
Next Stories
1 व्यभिचाराला गुन्हा ठरवणारे कलम रद्द, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल
2 भ्रष्ट अर्थ सचिवांकडून सोनिया गांधींना वाचवण्याचा प्रयत्न, सुब्रमण्यम स्वामींचा आरोप
3 योगी आदित्यनाथांविरोधात याचिका करणाऱ्याला सामूहिक बलात्काराप्रकरणी अटक
Just Now!
X