News Flash

Rafale Deal: राहुल गांधींना भाजपाची शिकवणी

विद्यमान सरकार राफेल करारावर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार आहे. पण विरोधक सरकारचं ऐकून घेत नाही.

संग्रहित छायाचित्र

राफेल करारावरुन मोदी सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांना पक्षातील नेत्यांकडून योग्य माहिती दिली जात नाही आणि म्हणूनच राहुल गांधी यांच्यासाठी मी एक शिक्षक नेमण्यास तयार आहे, असा चिमटा त्यांनी काढला आहे.

राफेल करारावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारमन यांनी सीएनएन- न्यूज १० या इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. राफेल करारासंदर्भात त्या म्हणाल्या, यूपीए सरकारच्या काळात राफेल करार का मार्गी लागला नाही, याचे उत्तर आधी राहुल गांधींनी दिले पाहिजे. विद्यमान सरकार राफेल करारावर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार आहे. पण विरोधक सरकारचं ऐकून घेत नाही. तुम्ही चर्चेला सुरुवात करता आणि या चर्चेत उत्तर देण्यासाठी ज्यावेळी मंत्री उभे राहतात त्यावेळी तुम्ही पंतप्रधानांना बोलावण्यासाठी गदारोळ सुरु करता, असे त्यांनी काँग्रेसला सुनावले.

मी आणि अरुण जेटली यांनी राफेल कराराबाबत अनेकदा वस्तूस्थिती सर्वांसमोर मांडली आहे. पण राहुल गांधींना सत्य परिस्थिती जाणून घ्यायची नाही. ते वारंवार तेच प्रश्न विचारतात. काँग्रेसकडून त्यांना पुरेशी माहिती दिली जात नसल्याचे दिसते. जर काँग्रेस त्यांच्यासाठी एक चांगला शिक्षक शोधू शकत नसतील तर मी त्यांच्यांसाठी एक चांगला शिक्षक शोधून देण्यास तयार आहे. राहुल गांधी बहुधा पेपर वाचत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 10:14 am

Web Title: rafale deal nirmala sitharaman offered to arrange tutor for rahul gandhi
Next Stories
1 आधी उडवली खिल्ली, आता अफगाणिस्तानात सहकार्यासाठी ट्रम्प यांची मोदींशी चर्चा
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 भाजपा नेत्याचा प्रताप, मंदिरात वाटल्या दारुच्या बाटल्या
Just Now!
X