25 September 2020

News Flash

धाडसी राजकीय निर्णयामुळेच राफेलचा सौदा मार्गी

फ्रान्सकडून राफेल विमाने विकत घेण्याची प्रक्रिया सुमारे १० वर्षे रेंगाळल्यानंतर धाडसी राजकीय निर्णयामुळेच हा सौदा मार्गी लागला आहे.

| April 12, 2015 04:59 am

फ्रान्सकडून राफेल विमाने विकत घेण्याची प्रक्रिया सुमारे १० वर्षे रेंगाळल्यानंतर धाडसी राजकीय निर्णयामुळेच हा सौदा मार्गी लागला आहे. भारत सरकारने थेट फ्रान्स सरकारशीच बोलणी केल्यामुळे ही ३६ विमाने किमान १० टक्के कमी किमतीत भारताला मिळतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.
उड्डाणासाठी तयार असलेल्या स्थितीत ३६ राफेल जेट लढाऊ विमाने ‘लवकरात लवकर’ भारताला मिळावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स सरकारला सांगितले. हा व्यवहार थेट दोन्ही सरकारांमध्ये झाला आहे. यापूर्वी संरक्षण मंत्रालयाने राफेलचे उत्पादन करणाऱ्या ‘दासॉल्त’ कंपनीशी निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून वाटाघाटी सुरू ठेवल्या होत्या. कठोर तांत्रिक मूल्यमापन आणि जागतिक निविदा प्रक्रिया हे सुमारे १० वर्षे चालल्यानंतर भारतीय वायुदलाने राफेलची मध्यम बहुउपयोगी लढाऊ विमान (मीडियम मल्टि-रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट- एमएमआरसीए) म्हणून निविदेसाठी निवड केली होती. मात्र नंतर दासॉल्त कंपनीने तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यास नकार दिला. मूळ निविदेचा भंग करून किंमत वाढवली आणि भारतात तयार झालेल्या विमानांचा वेळेवर पुरवठा करण्याची जबाबदारी घेण्यास नकार दिल्यामुळे हा व्यवहार वादात अडकला.
एकूण १२६ विमानांपैकी ३६ विमाने तातडीने घेण्यासाठीचे उघड कारण म्हणजे वायुदलाला लढाऊ विमानांची तातडीची गरज हे होय. वायुदलाकडील विमानांच्या प्रमाणित ४२ स्क्वाड्रन्सची संख्या सध्या ३४ पर्यंत खाली आली आहे. प्रत्येक वायुदलप्रमुखाने बहुपयोगी लढाऊ विमाने तातडीने मिळवण्याची गरज अधोरेखित केली होती. यातूनच वायुदलाची तातडीची गरज भागवण्यासाठी हा सौदा होत असून इतर वाटाघाटी नंतर होऊ शकतील.
राफेल विमाने खरेदीचा सौदा प्रक्रिया आणि किमतीच्या वाटाघाटी यामध्ये अडकून पडल्यामुळे दोन्ही बाजूंना नैराश्य आले होते. यातूनच भारत सरकारने धाडसी राजकीय निर्णय घेतला आणि थेट फ्रान्स सरकारशीच बोलणी केली. यामुळे ही ३६ विमाने किमान १० टक्के कमी दराने भारताला मिळतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. संरक्षण खात्यासाठी अर्थसंकल्पात मर्यादित निधी उपलब्ध असल्याने भारतासाठी आर्थिक मुद्दय़ाला अधिक महत्त्व आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 4:59 am

Web Title: rafale fighter jet deal what does it mean for india
Next Stories
1 ‘सुभाषचंद्रांच्या नातेवाईकांवर गुप्तहेर नेमल्याची चौकशी करू’
2 रेल्वे क्षेत्रात फ्रान्सचे भारताला सहकार्य
3 मुस्लीम ब्रदरहूडचे नेते बाडी यांच्यासह १५ जणांना फाशीची शिक्षा
Just Now!
X