21 October 2020

News Flash

राघव बहल यांच्या निवासस्थानी आणि ‘द क्विंट’च्या कार्यालयावर छापा

कर चुकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून आयकर विभागाच्या पथक या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करत आहेत.

संग्रहित छायाचित्र

प्रसारमाध्यमांमधील दिग्गज राघव बहल यांच्या निवासस्थानी आणि ‘द क्विंट’च्या कार्यालयावर आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकला. कर चुकवल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.तर आम्ही नियमितपणे कर भरतो आणि याची सर्व कागदपत्रे उपलब्ध असल्याचा दावा राघव बहल यांनी केला आहे.

आयकर विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी राघव बहल यांच्या निवासस्थानी आणि त्यांनी सुरु केलेल्या ‘द क्विंट’ या न्यूज पोर्टलच्या कार्यालयावर छापा टाकला. कर चुकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून आयकर विभागाच्या पथक या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करत आहेत. बहल यांनी क्विंटसह नेटवर्क १८ समुहाचेही संस्थापक आहेत.

आयकर विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी राघव बहल यांच्या निवासस्थानी आणि त्यांनी सुरु केलेल्या ‘द क्विंट’ या न्यूज पोर्टलच्या कार्यालयावर छापा टाकला. कर चुकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून आयकर विभागाच्या पथक या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करत आहेत.
राघव बहल यांनी एडिटर्स गिल्डलाही यासंदर्भात माहिती दिली आहे. आयकर विभागाच्या कारवाईनंतर राघव बहल यांनी ट्विट केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे. त्यांनी छाप्यादरम्यान कार्यालयातील पत्रकारांकडील कागदपत्रांची तपासणी करु नये. पत्रकारितेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय कागदपत्रे आहेत. जर त्यांनी असे केले तर आम्ही याचा तीव्र निषेध करु. आमच्या या विनंतीची दखल घेतली जाईल अशी आशा आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच अधिकाऱ्यांनी मोबाईल फोनव्दारे कागदपत्रे स्कॅन करुन अधिकाराचा दुरुपयोग करु नये, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 12:05 pm

Web Title: raghav bahl residence quint news portal office it raid
Next Stories
1 INX Media Case: कार्ती चिदंबरम यांच्या संपत्तीवर टाच
2 रिलायन्सला काम देण्याच्या अटीवरच झाला राफेल करार; फ्रान्सच्या वृत्तपत्राचा दावा
3 #MeToo : सुहेल सेठवरही लैंगिक गैरवर्तन आणि छळाचे आरोप
Just Now!
X