News Flash

पत्नीला दरमहा ४० हजार रुपये द्या!

पत्नीपासून वेगळे राहणाऱ्या अभिनेता रघुवीर यादव यांना दरमहा ४० हजार रुपये निर्वाह भत्ता म्हणून पत्नीला देण्याचे आदेश दिल्ली न्यायालयाने दिले आहेत.

| February 21, 2014 02:50 am

पत्नीपासून वेगळे राहणाऱ्या अभिनेता रघुवीर यादव यांना दरमहा ४० हजार रुपये निर्वाह भत्ता म्हणून पत्नीला देण्याचे आदेश दिल्ली न्यायालयाने दिले आहेत. निर्वाह भत्त्याची रक्कम कमी करण्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ती फेटाळून लावत, एवढी रक्कम देण्यासाठी तुम्ही समर्थ आहात, असे न्यायालयाने सांगितले.
रघुवीर यादव यांनी मारहाण केल्याची तक्रार केल्यानंतर त्यांची पत्नी त्यांच्यापासून वेगळी राहत आहे. वेगळय़ा राहणाऱ्या पत्नीला दरमहा ४० हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने दिले होते. त्या विरोधात यादव यांनी सत्र न्यायालयात याचिका केली. मात्र सत्र न्यायालयाने स्थानिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. ‘‘एवढी रक्कम देण्यास यादव असमर्थ आहे, असे वाटत नाही, तसेच स्थानिक न्यायालयाचा निर्णय चुकीचा नव्हता,’’ असे सांगत न्यायालयाने यादव यांना दरमहा ४० हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचे आदेश दिले.
रघुवीर यादव यांनी लगान, मॅसे साहीब, पीपली लाइव्ह, गांधी टू हिटलर यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 2:50 am

Web Title: raghubir yadav told to pay rs 40000 to estranged wife
Next Stories
1 ७२०० किलोमीटर रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर
2 राजीव मारेकऱ्यांच्या सुटकेला स्थगिती
3 मोदी, केजरीवाल, ममता, लालूप्रसाद आणि अखिलेश यांच्याशी करा ‘फेसबुक चॅट’!
Just Now!
X