रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्‍‌र्हनरपदी कोणीही आले तरी तिचा पाया मजबूत असून ती तग धरेल. त्यामुळे गव्हर्नरपद हे व्यक्तिकेंद्रित नसावे. हे पद कोणत्याही व्यक्तिपेक्षा अधिक मोठे आहे, अशी संयत भूमिका रघुराम राजन यांनी ‘इकॉनॉमिस्ट’ या प्रतिष्ठित मासिकाकडे मांडली आहे.

राजन यांना मुदतवाढ मिळणार का, ही चर्चा सुरू होताच ‘इकॉनॉमिस्ट’ला राजन यांनी ही मुलाखत दिली असली तरी त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर या प्रतिक्रियेला महत्त्व आले आहे.

राजन यांच्या अनपेक्षित निर्णयाचे बाजारावर विपरीत परिणाम होऊ नयेत, यासाठी सेबीने तसेच बँकांनी सावधगिरीचे उपाय योजले आहेत.