21 January 2021

News Flash

नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेची घसरगुंडी – रघुराम राजन

देशाच्या वाढत्या गरजेपुढे सध्याचा सात टक्के विकासदर कमी

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (संग्रहित छायाचित्र)

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे गेल्यावर्षी भारतीय अर्थव्यवस्था घसरली आहे. देशाच्या वाढत्या गरजेपुढे सध्याचा सात टक्के विकासदरही कमी असल्याचे मत माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. बर्कलेतील कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये ते बोलत होते. नोटाबंदी आणि ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीतील त्रुटींचा मोठा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. जीएसटी आणि नोटाबंदी लागू होण्यापूर्वी चार वर्षापर्यंत (२०१२-२०१६) भारताच्या विकासदरांमध्ये वेगाने वाढ होत होती, असेही रघुराम राजन म्हणाले.

भारताचे भविष्य (Future of India) यावर बोलताना रघुराम राजन म्हणाले की, ‘ नोटाबंदी आणि जीएसटीच्या लागोपाठ दोन झटक्यामळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम घडला आहे. जागतिक अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असताना भारतीय अर्थव्यवस्था घसरली.’ भारताची अर्थव्यवस्था जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत दुप्पट वेगाने वाढत आहे. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचा आलेख चढता असला तरीही देशातील रोजगाराच्या संधी वाढत नाही. गेल्या २५ वर्षापासून भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. सध्याचा सात टक्के विकासदर कमी आहे. बेराजगार तरूणांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणे गरजेचे आहे. जेणेकरून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असेही राजन म्हणाले.

भारताच्या वाढत्या इंधन किंमतीविषयी बोलताना राजन म्हणाले की, ‘ नोटाबंदी आणि जीएसटीमधून सावरत भारताचा विकासदर पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. अशामध्ये इंधन दरवाढीमुळे त्याला खिळ बसू शकते. वाढत्या इंधनाच्या किंमतीमुळे अर्थव्यवस्था वाढीला अडचण येण्याची शक्यता आहे. भारतीय सरकारने लवकरात लवकर योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे.’

‘भारताचा विकसदर सात टक्केपेक्षा कमी होत असेल तर आपल्याकडून काहीतरी चूक होत असल्याचे समजावे, भारतामध्ये विकासाची क्षमता आहे. आगामी १० ते १५ वर्षांपर्यंत भारताचा विकासदर आणखी वाढू शकतो, असे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले.’ बँकातील एनपीए, इन्फ्रास्ट्रक्चर आणि वीज या तीन महत्वाच्या अडचणी सध्या भारतापुढे असल्याचेही यावेळी राजन यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2018 6:38 pm

Web Title: raghuram rajan demonetisation gst held back indias economic growth 7 not enough
Next Stories
1 समुद्रात अमेरिका-चीनच्या युद्धनौकांमध्ये संघर्ष! दोन्ही देशात वाढला तणाव
2 भांडण झाल्यानंतर विवाहित महिलेने प्रियकराचे कापले गुप्तांग
3 ही निवडणूक ‘नवीन छत्तीसगड’च्या निर्मितीसाठीची – शाह
Just Now!
X