01 October 2020

News Flash

रघुवंश प्रसाद सिंह यांचं निधन; लालू प्रसाद यादव यांना भावना अनावर

३२ वर्षांपासून राजदमध्ये होते सक्रिय

रघुवंश प्रसाद सिंह (संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं आज निधन झालं. ७४ वर्षांचे होते. सिंह हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली. सिंह यांच्या राजदचा दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. त्यांच्या निधनानंतर लालू प्रसाद यादव यांनी शोक व्यक्त केल्या.

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सिंह यांना आयसीयू वार्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यानं त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, आज (१३ सप्टेंबर) त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं.

रघुवंश प्रसाद यांच्या निधनाचं वृत्त समजताच बिहारमध्ये राजकीय वर्तुळातून दुःख व्यक्त केलं जात आहे. आयसीयू वार्डात असतानाच रघुवंश प्रसाद सिंह यांनी राजदचा राजीनामा दिला होता. रघुवंश प्रसाद यांच्या निधनानंतर राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. “प्रिय रघुवंश बाबू, हे आपण काय केलं? मी परवाच आपल्याला सांगितलं होतं की, तुम्ही कुठेही जात नाही आहात. पण, तुम्ही इतके दूर निघून गेलात. निशब्द झालोय. दुःखी झालोय. तुमची खूप आठवण येईल,” असं म्हणत लालू प्रसाद यादव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रघुवंश प्रसाद मागील ३२ वर्षांपासून राजदमध्ये होते. बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच त्यांनी आयसीयूतून पक्षाचा राजीनामा दिला होता. रांचीमध्ये उपचार घेत असलेल्या लालू प्रसाद यादव यांना त्यांनी राजीनामा पाठवला होता. रघुवंश प्रसाद यांचं राजदमध्ये चांगलं वजन होतं. पक्ष दिशा भरटकल्यास ते महत्त्वाची भूमिका वठवायचे, लालू प्रसाद यादव हे सुद्धा रघुवंश यांनी दिलेले सल्ले ऐकून घ्यायचे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 1:47 pm

Web Title: raghuvansh prasad singh passes away in new delhi bmh 90
Next Stories
1 दिलासादायक : करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्राची आघाडी कायम
2 “५६ लोकं हिंसाचारात मारली गेली, भडकाऊ भाषणांचा व्हिडिओ आहे, त्यांच्यावर कारवाई का नाही?”
3 करोनामुक्त झालेल्यांना आरोग्य मंत्रालयाच्या खास सूचना
Just Now!
X