काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं भारतीय नागरिक्तत्व लवरकरच रद्द होईल, असा दावा भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. २० फेब्रुवारी रोजी हैदराबादमधील एका जाहीर कार्यक्रमात स्वामी यांनी हे वक्तव्य केलं आहे. The Hindu या वृत्तमानपत्रानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हैदराबाद विद्यापीठात “CAA – a historical imperative beyond contemporary politics” या विषयावर स्वामी बोलत होते. आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं (एबीव्हीपी) हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बोलताना स्वामी यांनी भारतीय संविधानाचा हवाला देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द होऊ शकतं असं म्हटलेय.

अमित शाहांच्या टेबलवर फाईल –
स्वामी म्हणाले की, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नागरिकत्वाची फाईल अमित शाह यांच्या टेबलवर आहे. लवकरच त्यांना नागरिकत्व गमावावं लागू शकतं.

संविधानाचा हवाला –
यावेळी बोलताना स्वामी यांनी भारतीय संविधानाचा हवाला देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नागरिक्तव गमावावं लागेलं, असा दावा केला. ते म्हणाले की, भारतीय असताना इतर देशाचं नागरिकत्व घेतात, त्यांचं नागरिक्तव रद्द होतं.

स्वामींचा दावा –
व्यावसायासाठी राहुल गांधी यांनी इंग्लंडचं नागरिकत्व स्वीकारलं होतं. पण, राहुल गांधी भारतीय नागरिकत्वासाठी पुन्हा अर्ज करू शकतात. कारण, त्यांचे वडील राजीव गांधी भारतीय होते. पण सोनिया गांधी यांची प्रतिष्ठा पाहता राहुल गांधी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करणार नाहीत असं वाटतेय.

सुधारित नागरिक्तव कायद्यावर काय म्हणाले स्वामी? –
कोणतीही माहिती नसताना सुधारित नागरिकत्व कायद्याचा विरोध केला जातोय. मुळात विरोध करणाऱ्यांना या कायद्याबद्दल फारशी माहिती नाही. भारतीय मुस्लिमांना सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे कोणतीही अडचण होणार नाही. तसा तर्क काढणंही हास्यास्पद असल्याचं स्वामी म्हणाले.