01 March 2021

News Flash

राजीव गांधींच्या खास मित्राचे निधन; राहुल यांनी पार्थिवाला दिला खांदा

बुधवारी गोव्यामध्ये झालं निधन, आज दिल्लीमध्ये करण्यात आले अंत्यसंस्कार

(फोटो सौजन्य: काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरुन साभार)

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतिश शर्मा यांच्या पार्थिवावर आज दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. काँग्रेसने सोशल नेटवर्कींग साईट्सवरुन सतीश शर्मा यांचे काही खास फोटो ट्विट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज दिल्लीमध्ये शर्मा यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली. इतकच नाही तर राहुल यांनी शर्मा यांच्या पार्थिवाला खांदाही दिला.

सतिश शर्मा हे गांधी कुटुंबाचे खंदे समर्थक होते. राहुल गांधी यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या नेत्यांमध्ये शर्मा यांचं नाव आघाडीवर होतं. वयाच्या ७३ व्या वर्षी कॅन्सरमुळे शर्मा यांचे गोव्यामध्ये बुधवारी निधन झालं. शर्मा हे राजीव गांधींच्या खास मित्रांपैकी एक होते.

राहुल यांनी ट्विटरवरुनही शर्मा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रीमंडळामध्ये शर्मा हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री होते. त्यांनी १९९३ ते १९९६ दरम्यान हे मंत्रीपद भूषवले. तीन वेळा राज्यसभेमध्ये निवडून आलेल्या शर्मा हे गांधी कुटुंबियांचे पारंपारिक मतदारसंघ असणाऱ्या रायबरेली आणि अमेठीमधून निवडून आलेले. त्याचबरोबरच त्यांनी तीन वेळा राज्यसभेमधूनही खासदारकीची जबाबदारी पार पाडली.ते पहिल्यांदा जून १९८६ मध्ये राज्यसभेचे सदस्य झाले. त्यानंतर १९९१ साली राजीव गांधींचा मृत्यू झाल्यानंतर ते अमेठीमधून लोकसभेवर निवडून गेले होते. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोशल नेटवर्कींगवरुन शर्मा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही शर्मा यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली अर्पण केलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 2:34 pm

Web Title: rahul gandhi among pallbearers for congress veteran satish sharma scsg 91
Next Stories
1 मोदींनी विद्यार्थ्यांना म्हणाले, “एखाद्या समस्येचा भाग व्हायचं की समस्या सोडवणाऱ्यांपैकी व्हायचं हे…”
2 श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा जवानांवर गोळीबार; दोन जवान जखमी
3 पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर भाजपा मंत्र्याने मानले मोंदीचे आभार
Just Now!
X