चीन, करोना आणि लॉकडाउनच्या मुद्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पर्यावरणीय प्रभाव मूल्याकंन मसुद्यावरून (EIA2020) केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. या मसुद्याचा उद्देशच देशाला लुटण्याचा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. “देशाची लूट आणि पर्यावरणाचा विध्वंस थांबवण्यासाठी हा मसुदा मागे घ्यावा,” अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

करोना, लॉकडाउन व भारत-चीन सीमावादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्यानं मोदी सरकारला लक्ष्य करत आहेत. राहुल गांधी यांनी आता पर्यावरणीय प्रभाव मूल्याकंन मसुद्यावरून मोदी सरकारवर निवडक उद्योगपतींना मदत करत असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी ईआयए२०२० मसुद्यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ज्यात हा मसुदा भयंकर असल्याचं म्हटलं आहे. “ईआयए२०२० मसुद्याचा उद्देश स्पष्ट आहे, देशाची लूट. देशाच्या साधनसंपत्तीची लुट करणाऱ्या निवडक सुटाबुटातील मित्रांसाठी भाजपा सरकार काय काय करत आली आहे याचं हे आणखी एक भयंकर उदाहरण आहे. देशाची लूट आणि पर्यावरणाचा विध्वंस रोखण्यासाठी ईआयए२०२० मसुदा मागे घ्यायलाच हवा,” अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

आणखी वाचा- “देशातून खोटेपणाचा कचराही साफ करायला हवा”; स्वच्छ भारत मिशनवरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

आणखी वाचा- “राहुल गांधींकडे अध्यक्ष होण्याची क्षमता आणि योग्यता, मात्र…”, शशी थरुर यांनी मांडलं स्पष्ट मत

राहुल गांधी यांनी ईआयए२०२० बद्दल रविवारी ट्विट केलं होतं. “या मसुद्याविरोधात लोकांनी निदर्शनं करावी, कारण हा मसुदा भयंकर असून, याची अधिसूचना निघाली, तर त्याचे विनाशकारी परिणाम दीर्घकाळासाठी होतील”, असं म्हटलं होतं.