News Flash

लसीकरणावरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल! म्हणाले…

देशात करोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण सुरु आहे. या लसीकरणावरुन राहुल गांधी सतत मोदी सरकारवर निशाणा साधत असतात.

राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर टीका केली

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी करोना रोखण्यासाठी सुरु असलेल्या लसीकरणावरुन बर्‍याचदा केंद्रावर टीका केली आहे. दरम्यान, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये एक अहवाल शेअर केला आहे. या अहवालात कोविशिल्डच्या पहिल्या आणि दुसर्‍या डोसमधील अंतर वाढवल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, सरकारने शास्त्रज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढविले आहे.

राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान मोदींची खोटी प्रतिमा वाचविण्यासाठी केंद्र सरकार सतत व्हायरसचा आधार घेत आहे आणि जनतेचा जीव घेत आहे. देशातील लसीकरण लवकर पुर्ण करावे लागेल. मोदी सरकारच्या असक्रियतेमुळे लशीची कमतरता लपविण्यासाठी भाजपाने रोज खोटं बोलनं आणि पोकळ घोषणा देण्याने काही होणार नाही. देशाला त्वरित आणि संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता आहे.”

“दोन डोसमधलं अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती”, भारतीय वैज्ञानिकांचा धक्कादायक दावा!

देशात करोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण सुरु आहे. या लसीकरणावरुन राहुल गांधी सतत मोदी सरकारवर निशाणा साधत असतात.  १५ जूनपर्यंत देशभरात २८,००, ४५८ नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत २६,१९,७२,०१४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

देशात ८,६५,४३२ बाधित रुग्णांवर उपचार सुरु

देशात गेल्या २४ तासात ६२,२२४ नवीन करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर १,०७,६२८ जणांनी करोनावर मात केली आहे. तसेच गेल्या २४ तासात २५४२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार, देशातील करोनाची परीस्थिती आटोक्यात येत आहे. आतापर्यंत देशात २,९६,३३,१०५  रुग्ण आढळले आहेत. तर २,८३,८८,१०० बाधितांनी करोनावर मात केली आहे. ३,७९,५७३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ८,६५,४३२ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 2:07 pm

Web Title: rahul gandhi attacks modi government over vaccination srk 94
Next Stories
1 वाढदिवसाच्या दिवशीच मिथुन चक्रवर्ती यांची कोलकाता पोलिसांकडून चौकशी
2 केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदल : मोदींच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ तीन नेत्यांना मिळू शकते संधी
3 होणाऱ्या बायकोला शॉपिंगसाठी बोलावलं, लग्न पाच दिवसांवर असतानाच घेतला जीव
Just Now!
X