मागील काही वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेससमोर अनेक आव्हान निर्माण झालेली दिसत असून, पक्षाध्यपदाचा महत्त्वाचा प्रश्न काँग्रेसला सतावताना दिसतोय. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून पदाची धुरा सोनिया गांधी यांच्याकडे आहेत. मात्र, काँग्रेसला राहुल गांधी हेच नवसंजीवनी देतील, असं एका पाहणीत दिसून आलं आहे.

देशातील राजकीय, आर्थिक, राष्ट्रीय सुरक्षा, करोना परिस्थितीसंदर्भात ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने सर्वेक्षण केलं. ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ (Mood of The Nation 2020) नावानं करण्यात आलेल्या पाहणीत काँग्रेसच्यासंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला होता. “काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी कोणता नेता योग्य आहे, असं तुम्हाला वाटतं?,” असा प्रश्न विचारण्यात आला होता.

आणखी वाचा- योगी आदित्यनाथ सलग तिसऱ्यांदा ठरले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा कितवा क्रमांक ?

या प्रश्नाला उत्तर देताना सर्वात जास्त भारतीयांनी राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दिली आहे. २३ टक्के नागरिकांना वाटतं की, राहुल गांधी काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देऊ शकतात. राहुल गांधी यांच्या पाठोपाठ माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावाला पसंती दिली आहे. १८ टक्के भारतीयांना वाटतं की, मनमोहन सिंग यांचं नेतृत्त्व काँग्रेसला उभारी देऊ शकतं.

आणखी वाचा- मोदी सरकारने करोना स्थिती कशी हाताळली? २९ टक्के जनता म्हणते अगदी उत्तम; तर…

१४ टक्के लोकांनी माहिती नाही, असं उत्तर दिलं. तर १४ टक्के लोकांना वाटत प्रियंका गांधी या काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी योग्य नेत्या आहेत. १४ लोकांना वाटत सोनिया गांधी काँग्रेस पुन्हा चांगले दिवस आणू शकतात.

आणखी वाचा- चीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का? सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर

हे सर्वेक्षण २१ डिसेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान करण्यात आलं. यामध्ये १९४ विधानसभा मतदारसंघ आणि ९७ लोकसभा मतदारसंघातील १२ हजार १४१ जणांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं. यामध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील लोक सहभागी होते.