05 August 2020

News Flash

राहुल गांधींची मोदींवर टीका

भरघोस पैशांचा वापर करून सरकारे पाडणे हे सत्ताधारी पक्षाचे नवे प्रारुप असल्याचे दिसते

राहुल गांधी

भरघोस पैशांचा वापर करून सरकारे पाडणे हे सत्ताधारी पक्षाचे नवे प्रारुप असल्याचे दिसते, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तराखंडमधील राजकीय हालचालींच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप यांच्यावर रविवारी शाब्दिक हल्ला चढवला.
उत्तराखंडमधील राजकीय संकटाच्या मुद्दय़ावर केंद्रातील भाजपला लक्ष्य करण्यासाठी राहुल यांनी ट्विटरची मदत घेतली व नेत्यांच्या या वर्तणुकीशी काँग्रेस लोकशाहीच्या मार्गाने लढा देईल असे म्हणाले. आधी अरुणाचल व आता उत्तराखंडमध्ये झालेला हा लोकशाही व घटनेवरील हल्ला असून मोदीजी व भाजप यांचा हा खरा चेहरा आहे, असे त्यांनी अनेक ट्वीट्समधून सांगितले.
उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या ९ आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे हरीश रावत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार संकटात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2016 12:08 am

Web Title: rahul gandhi comment on narendra modi 4
टॅग Rahul Gandhi
Next Stories
1 दक्षिण काश्मिरात दहशतवादाला खतपाणी
2 रक्कावरील हवाई हल्ल्यांमध्ये ५५ जण ठार
3 पंजाबमध्ये २० कोटींचे हेरॉईन जप्त
Just Now!
X