News Flash

RSS ची चड्डी घालणाऱ्यांच्या हाती आसाम जाऊ देणार नाही-राहुल गांधी

आसामचा राज्यकारभार नागपूरमधून चालणार नाही असाही टोला त्यांनी लगावला

आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. RSS ची चड्डी घालणाऱ्यांच्या हाती आसाम जाऊ देणार नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. भाजपा आणि आरएसएसला आसामची संस्कृती, भाषा यावर अतिक्रमण करु द्यायचं नाही हे लक्षात ठेवा. आसामचा कारभार नागपूरवरुन चालणार नाही. आरएसएसचे चड्डीवाले आसामचा राज्य कारभार चालवणार नाहीत. आसामचा राज्य कारभार लोकशाही पद्धतीनेच चालला पाहिजे हे विसरु नका असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

गुवाहाटी येथे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात राहुल गांधी बोलत होते. ” मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात जी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती सध्या देशात निर्माण झाली आहे. सध्या देशात जे काही सुरु आहे त्यामागे भाजपाचा नियोजनबद्ध कट आहे. भाजपा जिथे जाईल तिथे द्वेष पसरवण्याचं काम त्यांच्याकडून केलं जातं. आसामच्या जनतेला असा द्वेष पसरवणारे लोक मान्य नाहीत. त्यामुळे आसामची सत्ता जर कोणी चालवणार असेल तर ती आसामच जनताच असेल. इथला कारभार नागपूरवरुन चालवला जाणार नाही. RSS चड्डी घालणाऱ्यांच्या हाती आसाम जाऊ देणार नाही” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 5:00 pm

Web Title: rahul gandhi controversial statement about rss scj 81
Next Stories
1 #CAA : “संसदेत उत्तरं न देणारे अमित शाह आता राहुल गांधींना चर्चेचं आव्हान देत आहेत”
2 गोव्यात सनबर्न फेस्टिवलदरम्यान दोन पर्यटकांचा मृत्यू
3 प्रामाणिकपणाची किंमत चुकवावी लागते – निवडणूक आयुक्त अशोक लवासा
Just Now!
X