31 May 2020

News Flash

‘राहुल गांधींना काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी बसवणे हे घराणेशाहीचे बोलके उदाहरण’

काँग्रेस हे बुडणारे जहाज असल्याची टीका करताना संपूर्ण देशाला राहुल गांधींची गुणवत्ता माहित आहे.

| June 1, 2016 07:32 pm

Rahul Gandhi : काँग्रेस सोनिया गांधी यांनी मंगळवारी मोदींवर टीका करताना त्यांना शहेनशहा म्हणून संबोधले होते. या पार्श्वभूमीवर भाजपकडून काँग्रेसला हे प्रत्युत्तर देण्यात आले.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा लवकरच राहुल गांधी यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याच्या वृत्तांचा बुधवारी भाजपकडून समाचार घेण्यात आला. राहुल यांचा राज्याभिषेक करून त्यांना पक्षाध्यक्षपदी बसविणे म्हणजे घराणेशाहीच्या राजकारणाचा उत्तम नमुना असल्याचे भाजपने म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी मोदींवर टीका करताना त्यांना ‘शहेनशहा’ म्हणून संबोधले होते.
नरेंद्र मोदी शहेनशहांसारखे! 
या पार्श्वभूमीवर भाजपकडून काँग्रेसला हे प्रत्युत्तर देण्यात आले. सोनिया गांधी यांच्या ‘शहजाद्या’च्या डोक्यावर पक्षाध्यक्षपदाचा मुकूट ठेवणे, हे ‘शहेशहानियत’चे (घराणेशाहीचे) बोलके उदाहरण असल्याचे भाजप प्रवक्ते सांबित पात्रा यांनी म्हटले. इतके वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहिल्यानंतर आता सोनियांकडून ती खुर्ची राहुल यांना दिली जात आहे. हे लोकशाहीला धरून आहे का?, ही घराणेशाही नव्हे का, असा सवाल पात्रा यांनी विचारला. याशिवाय, केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनीदेखील काँग्रेस हे बुडणारे जहाज असल्याची टीका करताना संपूर्ण देशाला राहुल गांधींची गुणवत्ता माहित असल्याचा खोचक टोला लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 6:25 pm

Web Title: rahul gandhi coronation as congress president a perfect example of dynastic politics bjp
Next Stories
1 बुद्ध मंदिरातील फ्रीजमध्ये सापडले वाघाच्या ४० बछड्यांचे मृतदेह!
2 लता मंगेशकर तथाकथित गायिका, ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ने उडवली खिल्ली
3 … आणि मोरोक्कोतील विद्यापीठाने भारताचा चुकीचा नकाशा झाकला
Just Now!
X