काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या नावाने केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून राहुल गांधींनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. “२०२०मध्ये तुमची संपत्ती किती वाढली? शून्य. तुम्ही जिवंत राहण्यासाठीचा लढा देत होतात. पण त्याचवेळी त्यांनी (अदानी) १.२ लाख कोटींची माया जमवली आणि आपली संपत्ती ५० टक्क्यांनी वाढवली. तुम्ही सांगू शकता का?” असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. यासाठी त्यांनी एका वृत्ताचा हवाला दिला आहे.

अदानींनी जेफ बेजोस, एलन मस्क यांनाही मागे टाकलं!

‘गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये २०२१मध्ये १६.२ अरब डॉलर म्हणजेच १.२ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे अदानींची संपत्ती आता ५० अरब डॉलर झाली आहे. वार्षिक कमाईच्या बाबतीत गौतम अदानींनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस आणि एलन मस्क यांना देखील मागे टाकलं आहे’, असं या वृत्तात म्हटलं आहे.

 

“एवढी चिंता राहुल यांना मी काँग्रेसमध्ये असताना असती तर…”; ‘भाजपामधील बॅकबेंचर’ वक्तव्यावर शिंदेंचं उत्तर

राहुल गांधींनी याआधी देखील अनेकदा गौतम अदानी आणि त्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे. नुकत्याच उद्घाटन झालेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये असलेल्या ‘अदानी एंड’, ‘रिलायन्स एंड’ यावरून देखील त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. आपल्या ट्वीटरच्या माध्यमातून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत.

“आणीबाणी लावणं एक चूक होती, पण…”; राहुल गांधींचं मोठं विधान