News Flash

‘सभी मोदी चोर हैं’ म्हटल्याबद्दल राहुल गांधींना समन्स

सूरत न्यायालयाची नोटीस, १६ जुलै अगोदर हजर व्हावे लागणार

संग्रहित छायाचित्र

मुंबई आणि पाटणा नंतर आता सूरतमधील एका न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. त्यांना १६ जुलै अगोदर न्यायालयात हचर व्हावे लागणार आहे. लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी ‘सभी मोदी चोर हैं’ असे म्हटले होते. या त्यांच्या वक्तव्यावरून गुजरातमधील मोध मोदी समाजाकडून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यावरून न्यायलयाने राहुल यांना समन्स पाठवले आहे.

अशाच प्रकारच्या एका प्रकरणात ६ जुलै रोजी पाटणातील न्यायालयाने राहुल यांना जामीन मंजूर केला होता. या ठिकाणी त्यांना दहा हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2019 9:33 pm

Web Title: rahul gandhi has been summoned by a surat court msr87
Next Stories
1 वॉशिंग्टन की मुंबई ; अमेरिकेच्या राजधानीचीही पावसानं केली वाताहत
2 अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी समिती स्थापन करावी : जनार्दन द्विवेदी
3 डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा भारतावर हल्लाबोल
Just Now!
X