28 September 2020

News Flash

“दोन्ही देशांमध्ये असं सरकार आहे जे…”; अमेरिकन हिंसाचाराचा संदर्भ देत राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

राहुल गांधी यांनी अमेरिकेचे माजी राजदूत निकोलस बर्न्स यांच्याशी साधला संवाद

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा उचलला. राहुल गांधी यांनी अमेरिकेत सुरू असलेल्या आंदोलाची तुलना भारताशी करत दोन्ही देशांमध्ये असहिष्णुतेचं वातावरण वाढत असल्याचं म्हटलं. परंतु त्यांनी ज्या अमेरिकन तज्ज्ञासमोर हा मुद्दा उचलला त्यांनी याचं सरळ शब्दात उत्तर देणं टाळलं. शुक्रवारी राहुल गांधी यांनी अमेरिकेचे माजी राजदूत आणि परराष्ट्र विषयांचे जाणकार प्रोफेसर निकोलस बर्न्स यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. दरम्यान, राहुल गांधींच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी अमेरिका यातूल लवकरच बाहेर पडणार असल्याचं म्हणत भारतावर कोणतंही वक्तव्य करणार नसल्याचं म्हटलं.

करोना व्हायरसचा जगावर कोणता परिणाम होत आहे या विषयावर राहुल गांधी यांनी निकोलस बर्न्स यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी करोना व्यतिरिक्त भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर आणि दोन्ही देशांच्या सद्यस्थितीवरही चर्चा केली. “दोन्ही देशांमध्ये सध्या असं सरकार आहे जे स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेतं. परंतु समाजामध्ये दुरावा निर्माण करण्याचं काम करत आहे,” असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. तसंच त्यांनी लॉकडाउनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. राहुल गांधी यांच्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर बोलताना निकोलस यांनी अमेरिका लवकरच यातून बाहेर पडेल असं म्हटलं. “तुमच्या देशाबद्दल मला इतकी माहिती नसल्यानं मी कोणतही वक्तव्य करणार नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

देशाच्या डीएनएमध्ये सहिष्णुता

“भारत आणि अमेरिकेमध्ये एक समानता आहे. दोन्ही देश सहिष्णू आहेत. परंतु दोन्ही देशांमध्ये असलेली महत्त्वपूर्ण बाब आता नाहीशी होताना दिसत आहे,” असं राहुल गांधी म्हणाले. यावेळी च्यांनी अमेरिकेत होत असलेल्या हिंचारावरही बोट ठेवलं. “अमेरिकेत ज्याप्रकारे आफ्रिकन-अमेरिक, अमेरिकन-मॅक्सिकन यांच्या दुरावा निर्माण केला जात आहे. तसंच भारतात हिंदू मुस्लिम यांच्यात दुरावा निर्माण केला जात आहे. मी भारताच्या डीएनएला चांगल्या प्रकारे ओळखतो आणि समतोही. लवकर सर्व समस्यांचं निराकरण होईल, अशी मी आशा करतो,” असंही ते म्हणाले.

लोकशाही पद्धतीनं तो़डगा निघावा

लडाखमध्ये सुरु असलेल्या भारत चीन तणावाच्या वातावरणावरून निकोलस यांनी राहुल गांधी यांना सवाल केला. यावर बोलताना राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर लोकशाही पद्धतीनं तोडगा काढण्यात यावा, असं ते म्हणाले. दरम्यान, निकोलस यांनी बोलताना चीन, भारत आणि अमेरिकेची बरोबरी करू शकत नसल्याचं म्हटलं. तसंच त्यांचा शासक भित्रा असल्याचं वक्तव्य केलं. चीनमध्ये लोकशाहीचं वातावरण नाही, तसंच विचारांना त्या ठिकाणी सुटही मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2020 11:52 am

Web Title: rahul gandhi in conversation with former american diplomat nicholas burns pm narendra modi video conference jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 धडकी भरवणारी बातमी… एकाच दिवसात १० हजार करोनाबाधितांचा टप्पा प्रथमच पार
2 “आमचं करोना पॅकेजही पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे”, इम्रान खान यांना भारताने सुनावलं
3 चीनची भारताला धमकी; अमेरिकेसोबत गेलात तर…
Just Now!
X