पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना काँग्रेस उपाध्यक्षही याच काळात अमेरिका दौऱ्यावर असणार आहेत. एका जागतिक परिषदेसाठी राहुल गांधीही अमेरिका दौऱ्यावर गेल्याचे पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंग सुर्जेवाला यांनी सांगितले.
अमेरिकेतील अस्पेनमध्ये जागितक परिषद होते आहे. त्यामध्ये भाग घेण्यासाठी राहुल गांधी अमेरिकेला जात आहेत. जगातील विविध देशांचे सरकारी आणि खासगी प्रतिनिधी या परिषदेमध्ये सहभागी होत आहेत, असे सुर्जेवाला यांनी सांगितले. या संदर्भात सोशल मीडियावर पसरलेले इतर सर्व अफवा त्यांनी फेटाळल्या. अमेरिकेहून परत आल्यावर ते बिहार निवडणुकीमध्ये पक्षाचे नेतृत्त्व करतील, असेही त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यासाठी बुधवारी सकाळी नवी दिल्लीहून रवाना झाले. या दौऱ्यात ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेमध्ये सहभागी होणार असून, त्याचबरोबर ते कॅलिफोर्नियालाही जाणार आहेत.