लोकसभा निवडणुकांसाठीचे रणमैदान तापलेले असतानाच भाजपाने एक ट्विट करत राहुल गांधींनाच PM म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात अल्प भूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजाराचे अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने जाहीर केला. मात्र ही तरतूद फसवी आहे. सरकारने प्रतिदिवस 17 रुपये देऊन शेतकऱ्याची खिल्ली उडवली आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली. आंध्रप्रदेश भाजपाने ट्विट करून काँग्रेसच्या ट्विटची खिल्ली उडवली आहे.

काँग्रेसने एक ग्राफिक ट्विट करत 6 हजारांची घोषणा कशी फसवी आहे हे सांगितले आणि भाजपावर निशाणा साधला. काँग्रेसच्या याच ट्विटला उत्तर देत आंध्रप्रदेश भाजपाने हे ग्राफिक राहुल गांधींनी तयार केलं असं असावा. कारण वर्षाला 6 हजार म्हणजे महिन्याला 500 रुपये होणारच यात वेगळं काय आहे? पप्पू पार्टीचा म्हणजेच काँग्रेसचा बुद्ध्यांक शून्य असून एक दिवस राहुल गांधी PM नक्की होतील असं ट्विट आंध्रप्रदेश भाजपाने केलं आहे. तसेच थांबा राहुल गांधी PM आहेतचकी… PM म्हणजे Poor in Maths असंही उत्तर देत राहुल गांधींना भाजपानेच PM म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी भाजपाने सादर केलेल्या बजेटवर केलेली टीका भाजपाने त्यांच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी या टीकेला उत्तर देणार का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. आम्ही सादर केलेले बजेट राहुल गांधींना कळलंच नाही असंही भाजपाने म्हटले आहे.