जेएनयूप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना देशद्रोही संबोधणारे राजस्थानमधील भाजपचे आमदार कैलाश चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौधरी आणि अन्य चार जणांवर कलम ३५२ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी एस. के. मिश्रा यांनी दिली.
गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवत चौधरी यांना कलम १२० (ब) लावण्यात आले आहे. अमेठीतील काँग्रेस कार्यकर्ते रवी दर्शन यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर ही कारवाई करण्यात आली. चौधरी हे राजस्थानमधील बायतो विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.