News Flash

जबाबदारी स्वीकारण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

छत्तीसगढचे आरोग्यमंत्री अमर अग्रवाल यांच्या जिल्ह्य़ात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान १३ महिला दगावल्या.

| November 16, 2014 05:04 am

छत्तीसगढचे आरोग्यमंत्री अमर अग्रवाल यांच्या जिल्ह्य़ात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान १३ महिला दगावल्या. या घटनेची जबाबदारी सरकारने स्वीकारण्याऐवजी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. त्यांनी शनिवारी  पीडित महिलांची भेट घेतली. जनतेला चांगली आरोग्यसेवा देणे ही जनतेची जबाबदारी आहे. मात्र  सरकार जबाबदारीपासून पळ काढत असल्याचे आल्याची टीका राहुल यांनी केली. या घटनेनंतर औषधे जाळून टाकण्याचा प्रयत्न म्हणजे पुरावे नाहीसे करण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2014 5:04 am

Web Title: rahul gandhi meets kins of chhattisgarh sterilisation incident victims slams raman singhs govt
टॅग : Rahul Gandhi
Next Stories
1 घोष यांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर लाठीमार ‘शारदा
2 नेहरू विद्यापीठात विद्यार्थिनीचा विनयभंग
3 ‘संघर्ष की सहकार्य याचा निर्णय आवश्यक’
Just Now!
X